Rashmi Shukla: रश्मी शुक्लांचं पोलीस महासंचालकपद पुन्हा वेटिंगवर! महायुतीमधील नेत्यांच्या त्या भूमिकेमुळं अडचण

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ रविवारी सेवानिवृत्त झाले आहेत. रजनीश सेठ यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची वर्णी लागेल अशा चर्चा सुरु होत्या
Rashmi Shukla
Rashmi Shukla

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ रविवारी सेवानिवृत्त झाले आहेत. रजनीश सेठ यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची वर्णी लागेल अशा चर्चा सुरु होत्या. मात्र, आज रजनीश सेठ यांच्या निवृत्तीनंतर तात्पुरता अतिरिक्त कार्यभार मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळं रश्मी शुक्ला यांचं राज्याच्या पोलीस महासंचालकपद पुन्हा लांबणीवर पडल्याच्या चर्चा आहेत.

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ निवृत्त झाले. रजनीश सेठ यांच्या निवृत्तीनंतर आता कार्यभार तात्पुरत्या स्वरुपात मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे देण्यात आला आहे.

Rashmi Shukla
पोलीस महासंचालक पदाचा तात्पूरता कारभार विवेक फणसाळकरांकडे; नितीन करीर मुख्य सचिवपदी

रश्मी शुक्ला यांच्या नावाला महायुती सरकारमधील नेत्यांचा विरोध?

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडचणीत आल्या होत्या. रश्मी शुक्ला यांच्यावर कथित फोन टॅपिंग प्रकरणी आरोप करण्यात आले होते. मविआ सरकारच्या काळात त्यासंदर्भात चौकशी देखील करण्यात आली होती. मविआ सरकारमधील तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळातील नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख आणि संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी माहिती दिली होती.

महाविकास आघाडीनं यासंदर्भातील कारवाई सुरु करताच रश्मी शुक्ला यांची प्रतिनियुक्तीवर केंद्र सरकारच्या सेवेत बदली करण्यात आली होती. त्यानतंर त्या सीआरपीएफमध्ये कार्यरत होत्या. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील प्रकरणांची चौकशी बंद झाली.

Rashmi Shukla
Nashik News: जिल्ह्यात 1 जानेवारीपासून ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान; शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलीस संचालक म्हणून रश्मी शुक्ला यांच्या नावाची अद्यापही घोषणा करण्यात आलेली नाही. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या महासंचालक पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. महायुतीमधील अनेकांचा रश्मी शुक्ला यांच्या नावाला विरोध असल्याने अद्याप निर्णय होत नसल्याचे म्हटले जात आहे. यामुळं रश्मी शुक्ला यांची नियुक्ती पुन्हा लांबणीवर पडल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं सध्या तात्पुरता पदभार मुंबई पोलीस आयुक्तांकडे देण्यात आलाय. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com