मतदार यादीत नाव शोधायचे आहे का? मतदान कार्ड, बूथ स्लीप नसेल तरीही करता येईल मतदान; मोबाईलवर घरबसल्या मिळेल बूथ मतदार स्लीप

ECI (तुमचा मतदार आयडी नंबर) १९५० या क्रमांकावर पाठवा. त्यानंतर आपल्याला केवळ १५ सेकंदात मतदार म्हणून नोंद असलेली बूथ स्लीप मिळेल. मतदानाला जाताना आपल्याजवळ ही स्लीप असावी, जेणेकरून आपल्याला सहजपणे मतदान करता येईल
youth voter registration
youth voter registrationesakal

सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आज (रविवारी) थंडावला. आता मतदारांना मतदान करण्याचे वेध लागले आहे. सोलापूर लोकसभेसाठी २० लाख ३० हजार ११९ तर माढा मतदारसंघासाठी १९ लाख ९१ हजार ४५४ मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघात देखील सहाच विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यातील तीन हजार ६१७ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदानापूर्वी प्रत्येक मतदारांपर्यंत बीएलओंच्या माध्यमातून घरोघरी बूथ स्लीप पोच करण्यात आल्या, पण अनेकांना त्या मिळालेल्या नाहीत. मतदानादिवशी प्रत्येक राजकीय पक्षांकडून बूथ स्लीप दिल्या जातात, पण त्याठिकाणी रांगेत उभारण्यापेक्षा मतदारांना घरबसल्या देखील आपले मतदान केंद्र कोठे आहे, हे मोबाईलवरूनही समजते. लोकशाहीच्या या उत्सवात सर्वच मतदारांनी आपला पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी...

  • जिल्हाधिकारी कार्यालय संकेतस्थळ : https://electoralsearch.eci.gov.in/

  • राज्य निवडणूक आयोग संकेतस्थळ : https://ceoelection.maharashtra.gov.in/search/

  • केंद्रीय निवडणूक आयोग संकेतस्थळ : https://voters.eci.gov.in

  • हेल्पलाइन ॲप : voter helpline app

  • हेल्पलाइन क्रमांक : १९५०

मतदान बूथ स्लीपसाठी एसएमएस सुविधा

ECI (तुमचा मतदार आयडी नंबर) १९५० या क्रमांकावर पाठवा. त्यानंतर आपल्याला केवळ १५ सेकंदात मतदार म्हणून नोंद असलेली बूथ स्लीप मिळेल. मतदानाला जाताना आपल्याजवळ ही स्लीप असावी, जेणेकरून आपल्याला सहजपणे मतदान करता येईल. पुन्हा केंद्रावर जाऊन आपल्याला मतदान बूथ स्लीप घेण्याची आवश्यकता भासणार नाही. आता शिक्षक तथा बीएलओंच्या माध्यमातून स्लीप वाटप सुरू आहे, पण अनेकांना त्या मिळालेल्या नाहीत. त्यांच्यासाठी हा एसएमएसचा पर्याय उत्तम आहे.

मतदान कार्ड नसल्यास ‘हे’ पुरावे ग्राह्य

पासपोर्ट, वाहन परवाना, राज्य व केंद्र सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले फोटो ओळखपत्र, बँक/पोस्ट ऑफिसमार्फत दिलेले स्मार्टकार्ड, पॅनकार्ड, आरजीआय/एनपीआरमार्फत दिलेले स्मार्टकार्ड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा जॉबकार्ड), कामगार मंत्रालय अंतर्गत स्वास्थ्य विमा स्मार्टकार्ड, फोटोयुक्त पेंशन दस्ताऐवज, खासदार, आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले कार्यालयीन ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखविल्यास मतदान करता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com