Maharashtra News : रब्बी हंगामापुढे टंचाईचे संकट; उत्तर अन् पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चिंता

Farmer Rain Waiting
Farmer Rain WaitingSakal

Maharashtra News : उत्तर अन् पश्‍चिम महाराष्ट्रासोबत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील रब्बी हंगामापुढे टंचाईचे संकट आहे. राज्यातील सरासरी ५३ लाख ९७ हजार हेक्टरपैकी तीन लाख १४ हजार हेक्टर म्हणजे सहा टक्के क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत.

त्यात उत्तर महाराष्ट्रातील एक हजार आणि पुणे विभागातील एक लाख ८० हजार, कोल्हापूर विभागातील ९१ हजार, छत्रपती संभाजीनगरमधील ३२ हजार हेक्टरचा समावेश आहे.

राज्यात यंदाच्या पावसाळ्यात ८८.४ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी १२१.४ टक्के पावसाची नोंद झाली होती. (water Scarcity crisis ahead of Rabi season maharashtra news)

५० ते ७५ टक्के पावसाच्या ११ जिल्ह्यांतील ११२ तालुक्यांचा, ७५ ते १०० टक्के पावसाच्या १६ जिल्ह्यांतील १४६ तालुक्यांचा समावेश आहे. १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झालेल्या ठाणे, रायगड, पालघर, नांदेड, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील ९४ तालुक्यांचा समावेश आहे.

तीन तालुक्यांत २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे. ५० ते ७५ टक्के पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिक, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, अकोला, अमरावती जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यातील ३१५ टँकरमध्ये २२८ टँकर उत्तर आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील आहेत. जिल्हानिहाय टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या पुढीलप्रमाणे असून, (कंसात सुरू असलेल्या टँकरची संख्या दर्शवते) : नाशिक ः १०६-२४२ (९९), धुळे ः १-० (१), जळगाव ः १३-० (१४), पुणे ः १०-६१ (१२), सातारा ः ५८-२६८ (६१), सांगली ः २९-२४९ (३३), सोलापूर ः ५-५२ (८), छत्रपती संभाजीनगर ः ५५-२ (५९), जालना ः १६-१३ (२८).

Farmer Rain Waiting
Nashik Onion Rate : दसऱ्याला कांद्यास उमराणेत 4 हजारांचा अन् कोपरगावमध्ये 4 हजार 150 रुपयांचा भाव

चार विभागांत पेरणी सुरू

रब्बी हंगामाच्या पूर्वमशागतीची कामे राज्यात सुरू आहेत. पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर विभागात ज्वारी, हरभरा, मक्याची पेरणी सुरू झाली आहे. नाशिक विभागात ज्वारी, हरभऱ्याची पेरणी काहीअंशी सुरू झाली आहे. पूर्व हंगामी ऊसलागवडीसाठी मशागतीची कामे सुरू आहेत. नाशिक विभागात पाच लाख आठ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे.

पुणे विभागात ११ लाख ४९ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असून, ज्वारी, गहू, हरभरा ही पिके संरक्षित पाण्याच्या क्षेत्रात उगवण अवस्थेत आहेत. कोल्हापूर विभागाचे सरासरी क्षेत्र चार लाख २६ हजार हेक्टर असून, गळीताला जाणारा ऊस जोमदार वाढीच्या अवस्थेत आहे. यंदा नवीन आडसाटील उसाच्या लागवडीची कामे पूर्णत्वास पोचली आहेत व लागण उगवणीच्या अवस्थेत आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील सरासरी क्षेत्र सात लाख ४१ हजार हेक्टर आहे. लातूर विभागातील १३ लाख ६४ हजार हेक्टरपैकी १२ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. अमरावती विभागातील सात लाख ४६ हजार आणि नागपूर विभागातील चार लाख २९ हजार हेक्टरवर पेरण्या अद्याप सुरू नाहीत.

Farmer Rain Waiting
Maharashtra News : विद्यार्थिनींना १०० टक्के शुल्क प्रतिपूर्तीसाठी प्रयत्न

रब्बी हंगामाची आताची स्थिती

(आकडे हेक्टरमध्ये दर्शवितात)

पिकाचे नाव सरासरी क्षेत्र आताची पेरणी २१ ऑक्टोबर २०२२ ची पेरणी

ज्वारी १७ लाख ५३ हजार ११८ दोन लाख ७७ हजार ४९५ एक लाख ८९ हजार ५४६

गहू दहा लाख ४८ हजार ८०७ ३८४ ३३

मका दोन लाख ५८ हजार ३२१ १५ १५१

हरभरा २१ लाख ५२ हजार १४ ११ हजार ७२१ सात हजार ९१

तेलबिया ५५ हजार ६६० ६२७ ९६२

Farmer Rain Waiting
Nashik Cotton Crop Rate : पांढरे सोने खरेदीचा मुहूर्त हुकला; कापसाच्या उत्पादनात विक्रमी घट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com