Onion News
Onion Newsesakal

Nashik Onion Rate : दसऱ्याला कांद्यास उमराणेत 4 हजारांचा अन् कोपरगावमध्ये 4 हजार 150 रुपयांचा भाव

Nashik Onion Rate : दसऱ्याच्या मुहूर्तावर कांद्याच्या आगारातील बाजारात मंगळवारी (ता. २४) लिलाव झाले. उमराणे (जि. नाशिक) येथे क्विंटलला सरासरी चार हजार, तर कोपरगाव (जि. नगर) येथे चार हजार १५० रुपये असा भाव मिळाला.

दुसरीकडे मात्र मक्याची किमान आधारभूत किंमत क्विंटलला केंद्र सरकारने दोन हजार ९० रुपये जाहीर केली असली, तरीही नांदगावमध्ये मक्याला क्विंटलला एक हजार ७५० रुपये असा भाव मिळाला. मागील आठवड्यात इथे एक हजार ६७५ रुपये क्विंटल भावाने मक्याची विक्री झाली होती. (4 thousand rate of onion in umrane and 4 thousand 150 rupees in Kopargaon nashik news)

मुहूर्तावर लासलगाव आणि कोपरगावमध्ये नवीन लाल कांद्याचे लिलाव झाले आहेत. त्यास क्विंटलला लासलगावमध्ये दोन हजार १५१, तर कोपरगावमध्ये दोन हजार ३०० रुपये असा भाव मिळाला आहे. उन्हाळी कांदा संपत येत असताना नवीन लाल कांदा बाजारात येण्यास सुरवात होते. प्रत्यक्षात मात्र नवीन लाल कांद्याची आवक वाढण्यासाठी आणखी महिन्याभराचा कालावधी अपेक्षित आहे.

परिणामी, शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या उन्हाळी कांदा भाव खात आहे. आता देशांतर्गत आणि निर्यातीची सारी मदार नाशिकच्या कांद्यावर अवलंबून असल्याने कांद्याच्या वाढत जाणाऱ्या भावावर नियंत्रणाच्या गंभीर प्रश्‍नाला केंद्र सरकारला सामोरे जावे लागणार आहे.

कांद्याला मंगळवारी (ता. २४) क्विंटलला मिळालेला भाव पुढीलप्रमाणे असून, (कंसात सोमवारी मिळालेला भाव रुपयांमध्ये दर्शवतो) : पुणे- तीन हजार २५० (दोन हजार ७५०), उमराणे- चार हजार (तीन हजार ९००), लासलगाव- तीन हजार ८०० (तीन हजार ९००), विंचूर- तीन हजार ७५० (तीन हजार ९००), नायगाव सिन्नर- तीन हजार ८५० (तीन हजार ७५०), कोपरगाव- चार हजार १५० (तीन हजार ५८०), पिंपळगाव- तीन हजार ९०० (तीन हजार ९००). याशिवाय राहातामध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर चार हजार ५० रुपये क्विंटल या भावाने कांद्याची विक्री झाली.

मक्याच्या अधिक उत्पादनाचा अंदाज

देशात २०२२-२३ मध्ये मक्याचे उत्पादन ३५९ लाख १३ हजार टन अपेक्षित असल्याचे तिसऱ्या आगाऊ अंदाज आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन ६.५ टक्के म्हणजे २१ लाख ८३ हजार टनांनी अधिक आहे.

Onion News
Nashik Cotton Crop Rate : पांढरे सोने खरेदीचा मुहूर्त हुकला; कापसाच्या उत्पादनात विक्रमी घट

त्याचवेळी राज्यातील यंदाच्या खरिपात नऊ लाख १४ हेक्टरवर मक्याची पेरणी झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेत ती ३.७४ टक्क्यांनी अधिक आहे. अधिक उत्पादनामुळे मक्याला अपेक्षित भाव मिळताना दिसत नाही.

हरभरा, तूर, सोयाबीनला मात्र किमान आधारभूत किंमतीपेक्षा अधिकचा भाव मिळत आहे. हरभऱ्याचे देशात गेल्या वर्षीइतके आताही १५३ लाख ४३ हजार टन उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या रब्बीसाठी हरभऱ्याची किमान आधारभूत किंमत क्विंटलला पाच हजार ३३५ रुपये इतकी होती. लातूरमध्ये या आठवड्यात हरभऱ्याला सहा हजार रुपये क्विंटल असा सरासरी भाव मिळाला.

दरम्यान, गेल्या वर्षीपेक्षा तूर उत्पादन १८ टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, तूर मोफत आयात धोरण मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आले आहे. ३४ लाख ३० हजार टन तुरीचे उत्पादन अपेक्षित आहे. यंदाच्या खरिपात तुरीला क्विंटलला किमान आधारभूत किंमत सात हजार रुपये आहे. लातूरमध्ये दसऱ्याला तुरीला क्विंटलला ११ हजार रुपये भाव मिळाला. मागील आठवड्यात ११ हजार ३२५ रुपये क्विंटल, या सरासरी भावाने लातूरमध्ये तूर विकली गेली होती.

सोयाबीनचे ११० लाख टन उत्पादन अपेक्षित

सोयाबीनचे देशात यंदा ११० लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. यंदाच्या खरिपासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत क्विंटलला चार हजार ६०० रुपये अशी निश्‍चित करण्यात आली आहे. मागील सप्ताहाच्या तुलनेत सोयाबीनच्या भावात ४.७ टक्क्यांनी आणि आवक ३२ टक्क्यांनी वाढली. लातूरमध्ये सोयाबीनला क्विंटलला सरासरी चार हजार ७२० रुपये असा भाव मिळाला.

Onion News
Nashik Onion Rates Hike: नामपूरला कांदा @4000! मागणी वाढत असल्याने प्रथमच उच्चांक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com