गुढीपाडव्याला पावसाचं संकट! विदर्भात गारपीटीचा तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र अन् कोकणात अवकाळीचा इशारा

Maharashtra Weather Update राज्यात काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा बसत असला तरी विदर्भासह मराठवाडा आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. येत्या चार दिवसात गारपीटीसह अवकाळीचं संकट राज्यावर घोंगावतंय.
Unseasonal Rain Across State

Unseasonal Rain Across State

Esakal

Updated on

Rain and Hailstorm Warning in Maharashtra उन्हाचे चटके तीव्र होऊ लागलेले असताना मराठवाड्यात सोमवारी अचानक हवामानात बदल झाला. काही भागांत ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली, तर लातूर व नांदेड जिल्ह्याच्या काही भागांत अवकाळी पाऊस झाला. मराठवाड्यासह राज्यात अनेक भागात तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर पोहोचलाय. मात्र तरीही येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. काही ठिकाणी गारपीटीचा इशाराही देण्यात आला आहे. सोमवारी लातूरमधील देवणी तालुक्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह काहीकाळ झालेल्या मुसळधार पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com