Weather
sakal
पुणे - कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गुरूवारी (ता. ७) आणि शुक्रवारी (ता. ८) तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान विदर्भात मात्र हवामान कोरडे राहील असा अंदाज आहे.