

Raigad Weather
ESakal
पाली : रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सकाळी आणि रात्री गारवा जाणवू लागला आहे. पहाटे डोंगररांगा, घाटरस्ते आणि परिसरात धुक्याची दुलई पसरत असून, ढग, हिरवाई आणि आल्हाददायक वातावरणामुळे पर्यटनाला चालना मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून सकाळी आणि रात्रीचे किमान तापमान २२ ते २५ अंश सेल्सिअसदरम्यान आहे, तर दुपारी कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे.