Why is the monsoon delayed in Maharashtra?
esakal
Maharashtra Monsoon Delay : राज्यात १५ जूनपासून मान्सून सक्रिय होण्याची अपेक्षा होती. मात्र, मान्सूनने पुन्हा एकदा दिशा बदलल्याने त्याचे आगमन आणखी लांबले आहे. सध्या अरबी समुद्रातील मान्सूनची वाटचाल थांबली असून, अफगाणिस्तानकडून येणाऱ्या गरम आणि कोरड्या वाऱ्यांमुळे त्याच्या प्रगतीला अडथळा निर्माण झाला आहे. हे वारे कमी झाल्यानंतरच मान्सून पुढे सरकण्याची शक्यता असून, मुंबईसह महाराष्ट्रात तो आता २० जूनच्या सुमारास दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.