Weather Update - पुढील 4 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस; हवामानचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain update

पुढील चार दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यतेचा अंदाज वर्तवला आहे.

पुढील 4 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस; हवामानचा अंदाज

गेले दोन ते तीन दिवस राज्यातील काही प्रदेशात पाऊस सुरु आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागांत काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी सुरु आहेत. दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणं राज्यात पाऊस सुरु आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने पुढील चार दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यतेचा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा: "पहिली पत्नी लोकांसमोर येऊ नये म्हणून वानखेडेंनी..."; मलिकांचा आरोप

दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी किनारपट्टी आणि येथील काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र पुढील 48 तासांत किनारपट्टीपासून दूर जाऊन अजून दाट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी गडगडटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सोमवारी काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. सध्या अरबी समुद्रात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र त्याचबरोबर राज्यात प्रवेश करणारे बाष्पयुक्त वारे यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे.

हेही वाचा: देशात डिजिटल तंत्रज्ञानाने लोकांचे आयुष्य बदलले - पंतप्रधान मोदी

loading image
go to top