Maharashtra Weather: लवकरच उन्हापासून दिलासा मिळणार! महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन कधी होणार? अखेर तारीख आली समोर

Maharashtra Monsoon News: भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मान्सून वेळेवर पुढे सरकेल असा अंदाज वर्तवला आहे. अनुकूल परिस्थिती राहिल्यास मान्सून ६ जूनपर्यंत कोकणात पोहोचण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

ESakal

Updated on

भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवला आहे. अनुकूल हवामानामुळे, मान्सून ६ जून रोजी कोकणात दाखल होण्याची शक्यता असून, त्यामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पुढील ४८ तासांत नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मान्सून केरळ आणि राज्यात वेळेवर दाखल होण्याची अपेक्षा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com