राज्यात तापमानातील चढ-उतार कायम; पावसाची उघडीप | IMD | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain update

राज्यात थंडी गायब, पावसाची उघडीप राहणार | Weather Update

पुणे : राज्यात मंगळवारी (ता.२३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर या भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झालीय. राज्यात ढगाळ हवामान व पावसामुळे थंडी गायब झाली असून कमाल तापमानात होत असलेली चढ-उतार कायम आहे. तर राज्यात बुधवारपासून (ता. २४) पावसाची उघडीप राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे शहर व परिसरात पुढील आठवडाभर आकाश निरभ्र आणि दुपारनंतर अंशत: धगाळ वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने दिला. त्यामुळे किमान तापमानात काहीसे चढउतार कायम राहणार आहे. शहरात मंगळवारी २०.४ अंश सेल्सिअस तर लोहगाव येथे २१.३ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत किमान तापमान ७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते.

हेही वाचा: 'इसिस काश्मीर'कडून गंभीरला जीवे मारण्याची धमकी

शहर परिसरात गेल्या आठवडयापासून ढगाळ वातावरण आणि एखाद दुसऱ्या दिवशी सायंकाळनंतर पडणाऱ्या पावसामुळे थंडीने पळ काढला होता. त्यातच उकाडा जाणवू लागला होता. मात्र आता हवामानात बदल होत असल्याने मुख्यत: कोरड्या हवामानाची शक्यता आहे. त्यामुळे आता किमान तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने नमूद केले आहे.

हेही वाचा: ओवैसींच्या गाडीवर कारवाई करणाऱ्या पोलिसाला बक्षीस, वाचा काय घडलं?

loading image
go to top