esakal | 'पश्चिम बंगालनं स्वबळ काय असतं ते दाखवून दिलं'; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

'पश्चिम बंगालनं स्वबळ काय असतं ते दाखवून दिलं'; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

'पश्चिम बंगालनं स्वबळ काय असतं ते दाखवून दिलं'; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई : शिवसेनेच्या 55 व्या वर्धापणदिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते, यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना ठाकरे यांनी बंगाली जनतेचं कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरे 'स्वबळा'चं महत्त्व सांगत होते. त्यावेळी त्यांनी पश्चिम बंगालचं उदाहरण दिलं.

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, स्वबळाचा अर्थ नुसतं निवडणुका जिंकणं नव्हे हे पश्चिम बंगालने दाखवून दिलं आहे. ममता बॅनर्जी तर लढल्याच आणि त्या जिंकल्याच पण त्यांच्याबरोबरच बंगालच्या जनतेचं देखील कौतुक आहे.

हेही वाचा: स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्ष सल्ला; म्हणाले...

कारण त्यांनी बंगालची ताकद दाखवून दिली आहे. निवडणुकीच्या काळात अनेक प्रकारचे हल्ले म्हणजेच सगळ्या प्रकारचे हल्ले झेलूनही बंगालने आपलं मत ठामपणे मांडलं. त्यांनी स्वत्व काय असतं ते दाखवून दिलं. बंगाली माणसाने आपलं मत निर्भिडपणे मांडलं. ज्या बंगालने स्वांतंत्र्यलढ्यासाठी वंदे मातरम हा मंत्र दिला त्याच बंगालने स्वबळ, आत्मबळ काय असतं ते दाखवून दिलं. प्रादेशिक अस्मिता कशी जपावी, हे बंगालने दाखवून दिलंय.

loading image