आता पुढचा प्रश्न; मुक्काम वर्षावर की मातोश्रीवर?

टीम-ई-सकाळ
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात अस्तित्वात येणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अशातच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यास त्यांचा मुक्काम वर्षावर असणार की मातोश्रीवर यावरून सोशल मिडीयावर चर्चांना वेग आला आहे.

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात अस्तित्वात येणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अशातच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यास त्यांचा मुक्काम वर्षावर असणार की मातोश्रीवर यावरून सोशल मिडीयावर चर्चांना वेग आला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान हे मुंबईतील वर्षा बंगला असते. आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले. आजपर्यंतचे जवळपास सर्वच मुख्यमंत्री हे वास्तव्यास वर्षा बंगल्यावर राहिलेले आहेत. परंतु, आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्याची चिन्हे असताना मुंबईतील ठाकरे कुंटुंबियांचे घर मातोश्री हे राजकीयदृष्ट्या महत्व प्राप्त झालेले निवासस्थान आहे. अशात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास ते मातोश्रीवरच कायम राहतात की वर्षा बंगल्याचा पर्याय निवडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शरद पवारांनी खेळला मास्टरस्ट्रोक 

ठाकरे कुटुंबियातील कुठलीही व्यक्ती आतापर्यंत थेट सत्तेत सहभागी न झाल्याने आणि कोणतेही संसदीय पद न भूषविल्याने सरकारी बंगला वापरण्याची वेळ त्यांच्यावर आली नव्हती. उद्धव ठाकरे हे ठाकरे कुटुंबियातली पहिलीच व्यक्ती असणार आहेत, जे संसदीय पद भूषविणार आहेत. त्यामुळे ते कोणत्या बंगल्याचा पर्याय निवडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी 1995 साली सेना-भाजप युतीचे सरकार आल्यास मनोहर जोशी आणि नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले होते.

किशोरी पेडणेकर यांचा नर्स ते महापौरपदाचा प्रवास!

दरम्यान, आज (ता.22) वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये या शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. यामध्ये, मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वांचीच सहमती झाली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीच स्पष्ट केले आहे. उद्धव यांनी अंतिम निर्णय घेतला नसला तरी शिवसेना आमदारांनाही उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे असे वाटत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: whare staying Uddhav Thackeray after get CM Post Varsha or Matoshree