एसटी कर्मचाऱ्यांना समजावताना शरद पवार काय म्हणाले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP president Sharad Pawar

एसटी कर्मचाऱ्यांना समजावताना शरद पवार काय म्हणाले?

मुंबई: महाराष्ट्रातले एसटी कर्मचारी गेले दोन महिने संपावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपावर (ST Workers Strike) गेल्या अनेक दिवसांपासून तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आज या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी एस कर्मचारी कृती समितीची शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह बैठक पार पडली आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेची कृती समितीच्या वतीने आणि अनिल परब (Anil Parab) यांच्या वतीने माहिती देण्यात आली. यावेळी शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना काही आवाहने केली आहेत.

हेही वाचा: कोरोनामुळे आधी नोकरी, नंतर वडील गमावले; मद्यधुंद पोलिसामुळे तरुणाचा मृत्यू

शरद पवार यांनी म्हटलंय की, परिवहन मंत्री परब, एसटी कर्मचारी कृती समिती, अधिकारी यांच्यासोबत चर्चा करायला बसलो. माझ्या दृष्टीने महाराष्ट्राचा प्रवासी अत्यंत महत्त्वाचा आहे. गेले दोन महिने संपामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली, जे हाल झालेत, त्याचं वर्णन न केलेलं बरं. दुसऱ्या बाजूला कोरोनाचा नवा अवतार चिंतेत भर टाकतो आहे. याचा सगळ्याचा महाराष्ट्राच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होतो आहे आणि असा परिणाम होत असताना सुद्धा परिवहन खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांनी जेवढं जास्त देता येईल तेवढा प्रयत्न केला. कृती समितीच्या सदस्यांचेही काही प्रश्न आहेत, काही कमतरता आहेत, हे कृती समितीने निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याही बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, हे करताना एसटी चालू झाली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांनी सेवेत आलं पाहिजे, अशी मागणी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: शरद पवारांनी शब्द दिलाय; कामावर या! कृती समितीचे ST कर्मचाऱ्यांना आवाहन

एसटी चालू झाली पाहिजे, कर्मचाऱ्यांनी सेवेत यायला पाहिजे, असं कृती समितीने मांडलंय. त्यांच्याबद्दल सकारात्मक मार्ग काढू शकू. मला आनंद वाटतोय की, जेवढे प्रतिनिधी आहेत, त्यांचा जसा कामगारांच्या हिताचा आग्रह त्याचबरोबर प्रवाशांच्या हिताचाही आग्रह आहे. त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. त्या दृष्टीने आवाहन त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांने केले आहे. शेवटी आपली बांधिलकी प्रवाशांशी आहे. त्याचा गांभीर्याने विचार करावा. एसटी पूर्ववत व्हावी, याची काळजी घ्यावी, असंही त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा: ST STRIKE : शरद पवार, अनिल परब आणि कृती समितीची पत्रकार परिषद

पुढे ते म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे सुरुवातीपासून हाच दृष्टीकोण आहे. कामगार संघटना, त्यांचे सहकारी वर्षानुवर्षे त्यांच्या हितासाठी वेळ देतात, संघर्ष करतात, त्यांचं आम्ही ऐकणारच नाही, अशी भूमिका काहींनी घेतली होती, म्हणूनच कामगारांचा संभ्रम झाला असावा, म्हणूनच हा दोन महिने संप झाला. माझ्या मते गेल्या अनेक वर्षांमध्ये अशा संपांमध्ये कामगारांचा दृष्टीकोन प्रवाशांबाबत विधायकच असतो. याचं भान कामगारांनी नेहमीच ठेवलेलं आहे. त्यामुळे कृती समितीने हेच भान आताही ठेवलयं, याचा मला आनंद आहे. प्रश्नांवर चर्चा होईलच, मात्र एसटी सुरु झाली पाहिजे, यावर आमचं बैठकीत एकमत झालंय. कृती समितीसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे.

विरोधी पक्षाकडून कामगारांना भरकटवण्याचं काम झालं यावर काय सांगाल, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, मला इथं राजकारण आणायचं नाहीये. त्यांच्या दृष्टीने जी काही भूमिका घ्यायची होती ती त्यांनी घेतली. आमच्यासमोर कामगारांच आणि प्रवाशांचं हित हाच मुद्दा आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top