दिल्लीहून गिरीष महाजनांनी अण्णांसाठी कोणता निरोप आणलाय?

एकनाथ भालेकर
Saturday, 9 January 2021

मागील भेटीत मंत्री गिरीष महाजन यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात झालेल्या आंदोलनाची सर्व कागदपत्रे व सरकाने अण्णांना दिलेली सर्व आश्वासने व केलेला पत्रव्यवहार हे सर्व दप्तर घेऊन गेले होते.

राळेगणसिद्धी : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मोदी सरकारला आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आज दुसऱ्यांदा माजी मंत्री गिरीष महाजन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला सायंकाळी राळेगणसिद्धीत दाखल होत आहेत. त्यांच्यासमवेत भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील व तालुका भाजपचे अध्यक्ष वसंत चेडे हे आहेत.

मागील भेटीत मंत्री गिरीष महाजन यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात झालेल्या आंदोलनाची सर्व कागदपत्रे व सरकाने अण्णांना दिलेली सर्व आश्वासने व केलेला पत्रव्यवहार हे सर्व दप्तर घेऊन गेले होते.

हेही वाचा - रोहित पवारांसाठी राम शिंदेंनी केला होता नवस

सर्व दप्तर ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करून ते दिल्ली दरबारात मांडणार होते. आता दिल्ली दरबारातून ते नेमका कोणता निरोप घेऊन आले आहेत. त्यातून अण्णांची ते कशी मनधरणी करून उपोषणापासून दूर कसे ठेवतील हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What message did Girish Mahajan send to Anna from Delhi?