esakal | राज्यात सत्ताबद्दल घडवणारे शरद पवार आज आहेत कुठे?
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad-Pawar

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (बुधवार) मुंबईतच असून, आज ते महाविकासआघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक घेणार आहेत. या महाविकासआघाडीत शरद पवारांचा शब्दाला मोठी किंमत असणार हे आता स्पष्ट आहे.

राज्यात सत्ताबद्दल घडवणारे शरद पवार आज आहेत कुठे?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (बुधवार) मुंबईतच असून, आज ते महाविकासआघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक घेणार आहेत. या महाविकासआघाडीत शरद पवारांचा शब्दाला मोठी किंमत असणार हे आता स्पष्ट आहे.

मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार, शपथ घेतो की...

राजकारणातील भीष्माचार्य शरद पवार यांनी देशभरात विजयाचा घोडा चौफेर उधळवत चाललेल्या भाजपला अखेर महाराष्ट्रात वेसण घातली. कायदा आणि बहुमताला न जुमानता सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच नख लावण्याचा प्रयत्न केल्याने संतापलेल्या शरद पवारांनी महाविकास आघाडीची केवळ सत्ता राखलेली नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना चितपट केले.

अन् फोन आल्याने सुप्रिया सुळे विधानभवनातून पळतच गेल्या, का?

दरम्यान, सत्तेच्या महानाट्याचा शेवटचा अंक मंगळवारी (25 नोव्हेंबर) निर्णायक आणि धोक्‍याच्या वळणावर असतानाही मुंबई सोडून त्यांचे आदर्श यशवंतराव चव्हाण यांच्या झालेल्या पुण्यतिथीला कऱ्हाडला प्रीतिसंगमावर जाण्याचा नेमही त्यांनी चुकविला नाही. मात्र यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीला पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री प्रीतिसंगमावर गेले नाहीत याची इतिहासात नोंद झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे आपले राजकारणातले गुरू आहेत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा मान्य केले आहे. पण महाराष्ट्रात गेले महिनाभर सुरू असलेल्या या सत्तानाट्यात शरद पवारांनी राजकारणाचे अनेक नवीन धडे भाजपच्या चाणक्‍यांना शिकवत महागुरूचे स्थान प्राप्त केले आहे.

loading image