esakal | मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार, शपथ घेतो की...
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar takes his mother name in Oath of MLA

आदित्य ठाकरे, रोहित पवार हे दोघेही प्रथमच आमदार म्हणून निवडून आले व विधानभवनात त्यांनी आज शपथ घेतली. शपथ घेताना रोहित पवारांनी आपले नाव असे काही घेतले की, सगळे बघतच राहिले...   

मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार, शपथ घेतो की...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पवार घराण्यातील सदस्य रोहित पवार यांनी आज प्रथमच आमदारकीची शपथ घेतली. ठाकरे व पवार यांच्या घराण्यातील 2 युवा आमदारांनी आज आमदारकीची शपथ घेतली. आदित्य ठाकरे, रोहित पवार हे दोघेही प्रथमच आमदार म्हणून निवडून आले व विधानभवनात त्यांनी आज शपथ घेतली. शपथ घेताना रोहित पवारांनी आपले नाव असे काही घेतले की, सगळे बघतच राहिले...   

मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि असेन - अजित पवार

सकाळी 8 वाजताच रोहित विधानसभेत दाखल झाले. विधानसभेच्या प्रवेशद्वारावरच आत्या सुप्रिया सुळे या त्यांच्या स्वागताला उभ्या होत्या. हसतमुखाने त्या सर्वांचे स्वागत करत होत्या. रोहितने त्यांना वाकून नमस्कार केला व मिठी मारली. त्यानंतर ते विधानभवनात निघून गेले. प्रमुख नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर रोहित पवार शपथ घ्यायला समोर आले. शपथ घेताना आधी आपले नाव घेऊन पुढील शपथ पूर्ण करायची पद्धत असते. त्याच पद्धतीन रोहित पवारांनी आपले नाव घेतले, पण ते जरा वेगळ्या पद्धतीत... त्यांनी शपथेला सुरवात केली की, मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार, शपथ घेतो की.... या वाक्यानंतर विधानसभेतील सर्व सदस्य त्यांच्याकडे बघत राहिले. इतर आमदार साधारण आपले व वडिलांचे नाव व आडनाव घेऊन शपथ घेतात. मात्र, रोहितने आईचेही नावमध्ये घेतल्याने त्यांचे कौतुक होते आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

79 वर्षांच्या वस्तादाचे डाव पैलवानांना कळलेच नाही

रोहित पवार कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. भाजपचे माजी मंत्री राम शिंदेंचा त्यांनी पराभव केला. बिझनेसमन असलेले रोहित पवार आपल्या आईच्या मदतीने समाजसेवेतही सक्रिय आहेत. रोहित पवार यांनी आज पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली. हा सोहळा पाहण्यासाठी सगळं कुटुंब आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळेंसह रोहित पवार यांच्या पत्नी कुंती आणि बहीण उपस्थित होत्या. हा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीसुप्रिया सुळेंनी ट्विट करूनही रोहितला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Photo : आमदारकीची शपथ घेण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी केले हे शुभकाम!

loading image
go to top