Sushilkumar Shinde: भाजपच्या कोणत्या बड्या नेत्याने ऑफर दिली? सुशीलकुमार शिंदेंनी स्पष्टच सांगून टाकलं

दोनदा पराभव होऊन देखील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पक्षात येण्यासाठी मला आणि प्रणिती शिंदे यांना ऑफर दिली होती, असं वक्तव्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं होतं.
Sushilkumar Shinde
Sushilkumar Shinde

सोलापूर- दोनदा पराभव होऊन देखील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पक्षात येण्यासाठी मला आणि प्रणिती शिंदे यांना ऑफर दिली होती, असं वक्तव्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं होतं. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना तोंड फुटलं आहे. यावरुन शिंदे यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.(Which big BJP leader offered congress Sushilkumar Shinde clearly stated)

भाजपच्या कोणत्या नेत्याने ऑफर दिली असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला होता. यावर शिंदे म्हणाले की, कोणी ऑफर दिलीये हे सांगायचं असतं का? ते सांगायचं नसतं. मला ज्यांच्याकडून ऑफर आली ते भाजपचे खूप मोठे नेते आहेत. पण, मी त्याच्याबाबत काहीही उघड करणार नाही.

Sushilkumar Shinde
Sushilkumar Shinde: प्रणिती शिंदे अन्‌ मला भाजपची ऑफर! माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेचा गौप्यस्फोट; चंद्रकांत पाटील आज घेणार भेट

स्पष्टपणे सांगतो की मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी पक्षात स्वागत असल्याचं म्हटलं असेल तर मी त्यांचे धन्यवाद करतो, असं शिंदे म्हणाले. दोन दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा धनुष्य हाती घेतला आहे. त्यामुळे आता सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे.

Sushilkumar Shinde
Rahul Narwekar: शिंदे गटामुळे राहुल नार्वेकर अडचणीत? मुंबई हायकोर्टाने पाठवली नोटीस

शिंदे काय म्हणाले?

सोलापूरमध्ये हुर्डा पार्टीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी गौप्यस्फोट केला होता. आता मी ८३ वर्षांचा आहे. त्यामुळे आता दुसऱ्याचे घर उभे करण्याचे काम करणार नाही. ज्या आईच्या कुशीत बालपण गेले अशावेळी आता दुसरीकडे जाणार नाही. प्रणिती शिंदे तर कधी पक्ष बदलण्याचा विचार करणार नाहीत. सध्या पक्षाला वाईट दिवस आले असतील पण आपण पुन्हा नव्याने उभे राहू असं ते म्हणाले होते.

भाजपने काय म्हटलं?

भाजपने ऑफर दिल्याची बातमी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळली आहे. आमचे आणि सुशीलकुमार शिंदे यांचे कौटुंबिक संबंध आहेत. पण, आम्ही सुशीलकुमार शिंदेंना ऑफर दिलेली नाही. त्यामुळे चर्चेत असलेल्या बातम्या खोट्या आहेत, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com