आर्थिक स्थितीवर आता श्‍वेतपत्रिका - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

मुंबई - जनतेला दिलेली वचने पूर्ण करायची आहेत. त्यासाठी राज्यातील आर्थिक परिस्थितीची श्वेतपत्रिका काढणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली. तसेच, दरवर्षी राज्यातून दीड ते पावणेदोन लाख कोटी रुपये महसूल केंद्राला जातो. दोन वर्षांसाठी हा कर माफ केला तरी राज्य कर्जातून बाहेर पडू शकते, तर केंद्राने साह्य केले पाहिजे, अशी भूमिकासुद्धा त्यांनी या वेळी मांडली.

विधानभवनाच्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, युती व आघाडीतले पक्ष बदलले आहेत. सत्तेत होतो आणि जनतेसाठी आवाज उठवत होतो. राज्यात विकासकामे कुठली चालली आहेत. कामे अडली असतील, तर का अडली असतील. काही विकासकामांची तातडीने आवश्‍यकता नसेल. काहींची तातडीने आवश्‍यकता असेल आणि त्याकडे दुर्लक्ष केले गेले असेल. हा लेखाजोखा समोर आणण्याची सूचना प्रशासनाला दिलेली आहे. कुठेही आकसाने सरकार वागणार नाही. ‘आरे’चे काम बंद आहे. मेट्रोच्या कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नाही. ‘आरे’ कारशेडचा प्रश्न मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.

पर्यावरणाचा ऱ्हास करून विकास माझ्या लेखी नाही. ठाकरे म्हणाले की, राज्यातून दीड ते पावणेदोन लाख कोटी रुपये महसूल केंद्राला जातो. दोन वर्षांसाठी हा कर माफ केला, तर माझे अख्खे राज्य कर्जातून बाहेर पडू शकते. नुसते सगळे मिळतेय म्हणून द्यायचे काही नाही. केंद्राने महाराष्ट्राला साह्य केले पाहिजे, सहकार्य केले पाहिजे. आम्ही सर्व पक्ष एकत्र बसून खातेवाटप निश्‍चित करू. अत्यंत समजुतीने तिन्ही पक्षांत खाती वाटली जातील. मी धरून सध्या सात मंत्री आहेत. परस्परांच्या संमतीने हे खातेवाटप केले जाईल, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

केंद्राकडे जाणार
राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत करायची आहे. आम्ही हेक्‍टरी २५ हजारांची मागणी केली होती. या संकटकाळात पंतप्रधानांकडून अपेक्षा आहे. विरोधी पक्षनेत्यांनीही केंद्राला विनंती केली पाहिजे. त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन केंद्र सरकारकडे जाऊ, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मी भाग्यवान मुख्यमंत्री आहे. ‘मी परत येईन,’ असे म्हणालो नव्हतो; तरी आलो. तीस वर्षे आम्ही ज्यांच्यासमवेत मैत्री केली, ते आता आमचे विरोधक आहेत. तर, ज्यांच्याशी लढलो ते आमचे मित्र म्हणून सोबत आहेत.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

‘मी पुन्हा येईन,’ म्हणालो होतो; पण टाइमटेबल सांगितले नव्हते. ‘मेरा पानी उतरता देखकर किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ, लौटकर वापस आऊँगा.’
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com