Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपालांचा राजीनामा कोण मंजूर करतं? पंतप्रधानांना आहे का अधिकार?

Governor Bhagat Singh Koshyari
Governor Bhagat Singh Koshyari

Governor Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भगतसिंह कोश्यारी हे वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात चर्चेत होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, "मी सर्व राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्याची माझी इच्छा पंतप्रधानांना सांगितली", असे पत्र राजभवनाने प्रसिद्ध केले आहे.

कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. राज्यभर आंदोलनं देखील करण्यात आली आहे. राज्यपांनी पंतप्रधांना पत्र लिहले आहे. दरम्यान राज्यपालांचा राजीनामा कोण मंजूर करतं ? पंतप्रधान मोदींना आहे का अधिकार?, हे आपण जाणून घेऊया....

Governor Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारी होणार पदमुक्त; मोदींना दिलेल्या पत्रात 'हे' सांगितलं कारण

राज्याचा राज्यपाल राष्ट्रपतीकडून सहीनिशी व स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे नियुक्त केला जातो. राज्यपालांकडे विशेष अधिकार असतात. राष्ट्रवतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहता येते. तसेच राज्यपाल राष्ट्रपतीस संबोधून आपल्या अधिकारपदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकतात. मात्र  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी यासंदर्भात कोणताही निर्यण घेऊ शकत नाहीत.

Governor Bhagat Singh Koshyari
Mary Kom : बृजभूषण वादचा चेंडू मेरी कोमच्या कोर्टात

राज्यपाल, ज्यावेळी तो आपले अधिकारपद ग्रहण करतात त्या दिवसापासून पाच वर्षापर्यंत ते त्या पदावर असतात. परंतु, राज्यपाल, त्याचा पदावधी संपला असला तरीही, त्याचा उत्तराधिकारी स्वत:चे अधिकारपद ग्रहण करेपर्यंत पद धारण करु शकतात. तसेच राष्ट्रपती त्यांना नियमित देखील ठेवू शकतात. 

Governor Bhagat Singh Koshyari
ZP School : सरकारी शाळाच भारी! एकाच विद्यार्थ्यासाठी रोज भरतो वर्ग, मिळतात सगळ्या सोयीसुविधा

राज्यपाल यांनी नरेंद्र मोदींना का पत्र पाठवलं. राज्यपाल राजीमाम्याबाबत गंभीर आहेत का?. राज्यापालांनी यापूर्वीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहले होते. दरम्यान त्यांनी राष्ट्रपतींऐवजी नरेंद्र मोदींना पत्र का पाठवले, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. 

Governor Bhagat Singh Koshyari
Share Market Closing : बँकिंग, आयटी आणि FMCG शेअर्समुळे शेअर बाजार तेजीत बंद; सेन्सेक्सचे तिहेरी शतक

५ सप्टेंबर २०१९ ला भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियूक्ती करण्यात आली. त्यावेळी राज्यात महाविकास आघाजीचे सरकार बनले होते. मात्र त्यापूर्वी दिड दिवसाच्या सरकारचा शपथविधी झाला होता. त्या शपथविधीमुळे राज्यपाल चर्चेत आले होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकाळात चे अनेक गोष्टींमुळे चर्चेत आले होते. महाविका आघाडी आणि राज्यपाल असा संघर्ष चर्चेत होता. 

Governor Bhagat Singh Koshyari
Abhay Deol : 'सगळ्यात विषारी माणूस म्हणजे अनुराग कश्यप!' अभयनं काढला वचपा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com