विधानपरिषदेत धनंजय मुंडेंच्या जागी आता कोण? Election Result 2019

NCP-Dhananjay-Munde
NCP-Dhananjay-Munde

सोलापूर : परळी विधानसभा मतदारसंघातून मंत्री पंकजा मुंडे यांचा धक्‍कादायक पराभव करुन विजयी झालेले धनंजय मुंडे आता विधान परिषदेत नव्हे, तर विधानसभेत दिसणार आहेत. काही महिन्यात त्यांची जागा रिक्‍त होणार असून त्यांच्या जागी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या दमदार यशानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे काही खरे नाही, असे समजून राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते भाजप-शिवसेनेत दाखल झाले. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यभर जाहीर सभांच्या माध्यमातून भाजप-शिवसेना महायुतीला टक्‍कर दिली. अपवाद वगळता पक्षांतर केलेल्या नेत्यांना जनतेने या निवडणुकीत हिसका दाखवून दिला. परळी विधानसभा मतदारसंघातून महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना जनतेने घरी बसवले आणि धनंयज मुंडे यांना नेता म्हणून स्वीकारले. त्यांची विधान परिषदेची जागा आता रिक्‍त होणार आहे.

तत्पूर्वी, राष्ट्रवादीतून मोठमोठ्या दिग्गजांनी शिवसेना-भाजपात प्रवेश केला, त्यामध्ये अनेकांच्या नावाची चर्चा होती. त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार बबनराव शिंदे, दिलीप सोपल यांची चर्चा होती. मात्र, माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादीतच राहणे पसंत केले. त्यांना आता विधान परिषदेच्या माध्यमातून पक्षनिष्ठेचे फळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

- पक्ष बदलणाऱ्या 'या' उमेदवारांना मतदारांकडून नारळ I Election Result 2019​

भूमिपुत्रांना टक्‍कर देत परके उमदेवार विजयी

मोहोळ विधानसभा मतदारसंघ एससीसाठी राखीव झाल्यानंतर या मतदारसंघातून रमेश कदम, यशवंत माने यांना आमदारकी मिळाली. त्यामध्ये शिवसेनेसह अन्य पक्षाच्या भूमिपुत्र उमेदवारांना टक्‍कर देत माजी आमदार राजन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रांत पाटील, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्‍यराणा पाटील यांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राखून ठेवला. त्यामुळे राजन पाटील यांना यंदा निश्‍चितपणे विधान परिषद मिळणार, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व्यक्‍त करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com