Comrade Govind Pansare: 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लिहिल्यानेच कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या; कुटुंबियांचा खळबळजनक दावा

२० फेब्रुवारी २०१५ रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या नेमकी कशामुळे झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. (Comrade Govind Pansare reason of Assassination)
Comrade Govind Pansare
Comrade Govind Pansare
Updated on

मुंबई- २० फेब्रुवारी २०१५ रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही हत्या नेमकी कशामुळे झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. गेले नऊ वर्ष सीआयडी या प्रकरणी तपास करत होती. पण, तपास योग्य दिशेने होत नव्हता. त्यानंतर हा तपास हायकोर्टाने एटीएसकडे सोपवला. मात्र, दहशतवाद विरोधी पथकाकडूनही याप्रकरणी प्रगती होत नसल्याचं दिसत आहे. (Who was Shivaji writing this book Comrade Govind Pansare reason of Assassination Sensational claim of the family)

Comrade Govind Pansare
Govind Pansare Case : शरद कळसकरने जाळल्या डायऱ्या, मोबाईल हॅण्डसेट; पानसरे हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कुटुंबियांनी आज कोर्टामध्ये खळबळजनक दावा केला. शिवाजी कोण होता? हे पुस्तक लिहिल्यानेच पानसरे यांची हत्या करण्यात आल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. या हत्येमागे सूत्रकार कोण? हत्येमागचं नेमकं कारण काय? हत्या कोणी केली? याबाबत अद्याप काहीही पत्ता लागलेला नाही.

कॉम्रेड गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरीलंकेश, डॉ. नरेंद्र दाभोळकर ही सर्व प्रकरणे एकमेकांशी जोडली गेलेली आहेत. इतर प्रकरणात तपास पुढे जात आहे. पण, कॉम्रेट पानसरे यांच्या प्रकरणात काहीही हाती लागत नाहीये. त्यामुळे हायकोर्टाने एटीएसला आपला अहवाल चार आठवड्यात सादर करण्यास सांगितलं आहे.

Comrade Govind Pansare
Pune News : सर्वसामन्यांना आधार देण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले - चंद्रकांत पाटील

आजच्या सुनावणीत पानसरे कुटुंबियांनी शिवाजी कोण होता? हे पुस्तक लिहिल्यामुळेच त्यांच्यावर गोळी झाडण्यात आल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी इतर काही पुरावे कोर्टासमोर सादर केले आहेत. जवळपास नऊ वर्ष होऊनची मारेकरी मोकाट का? असा उद्विग्न सवाल पानसरेंच्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, कोल्हापूर येथे राहत्या घरात त्यांच्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अद्याप दोषी पकडले न जाणे यंत्रणेचं मोठं अपयश आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com