
Sanjay Raut : शिवसेना २०२२ मध्ये फुटली, एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी ठाकरेंचं नेतृत्व धुडकावून लावलं. त्यानंतरच्या काळातही अनेक नेत्यांनी आमदारांनी आणि खासदारांनी देखील ठाकरेंची साथ सोडली. पण ठाकरेंची शिवसेना सोडताना जो जो व्यक्ती बाहेर पडला त्यानं खासदार संजय राऊत यांच्या नावानं खडे फोडत बाहेर पडला.
पण संजय राऊतचं या लोकांना पक्ष सोडण्यास कारणीभूत आहेत का? किंवा ते संजय राऊतांचंच नाव घेऊन का बाहेर पडत आहेत? याचं कारण स्वतः संजय राऊत यांनी सांगितलं आहे. साम टीव्हीवर 'ब्लॅक अँड व्हाईट' या कार्यक्रमात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.