अजित पवारांचा सल्ला मनावर घ्या; जाणून घ्या N95 मास्कचा फायदा

N95 Mask Protects from Corona Virus: कोरोनापासून बचावासाठी कापड किंवा सर्जिकल मास्क N95 मास्क जास्त फायदेशीर असल्याचे एका अभ्यासात समोर आलं आहे.
Ajit Pawar told to use N95 mask
Ajit Pawar told to use N95 maskEsakal

कोरोनामध्ये कोणता मास्क वापरणं जास्त फायदेशीर? (Which mask is more beneficial to use in Corona?)

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व्हायरसनं (Corona Virus) जगभरात हाहाकार माजवला आहे. जग हळूहळू कोरोनाच्या कचाट्यातून बाहेर पडत आहे, असं वाटत असतानाच 2021 च्या अखेरीस ओमिक्रॉन व्हेरीयंटमुळे (Omicron Varient) पुन्हा जगासमोर संकट उभं राहिलंय. सध्या भारतामध्येही कोरोनाच्या रुग्णवाढीचा (Corona Patient) दर झपाट्याने वाढलाय. पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) होतोय की अशी चर्चा आता होऊ लागली आहे. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय.

बाजारात अनेक प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. कपड्याचे मास्क (Clothes Mask), सर्जिकल मास्क (Surgical Mask) तसेच N95 मास्क (N-95 Mask) अशा प्रकारचे मास्क बाजारात उपलब्ध आहेत. परंतु कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी N95 मास्क वापरणं जास्त फायदेशीर असल्याचे तज्ञ सांगतात. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही N95 मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.

Ajit Pawar told to use N95 mask
Corona: पुण्याबाबत अजितदादांनी केल्या पाच महत्त्वाच्या घोषणा

कोरोनापासून बचावासाठी इतर मास्कच्या तुलनेत N95 मास्क वापरणं (N95 Mask) कसा उपयुक्त आहे, याबद्दलचा एक अभ्यास प्रसिद्ध झाला आहे. ACGIH's Pandamic Response Task Force या संस्थेने Spring 2021 मध्ये प्रकाशित एका अभ्यासात सर्व प्रकारच्या मास्कबद्दलची निरीक्षणं नोंदवली आहेत. यामध्ये एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तिच्या संपर्कात एखादी व्यक्ती आल्यास विविध मास्कनुसार संक्रमणासाठी किती वेळ लागू शकतो याचा अभ्यास केला आहे. यामध्ये मास्क न घातल्यास, कापडाचा मास्क, सर्जिकल मास्क घातला असल्यास आणि N95 मास्क घातल्यास अशा विविध परिस्थितींची निरीक्षणे नोंदवली आहेत.

1. मास्क न घातलेली व्यक्ती कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास (If a person without a mask comes in contact with a coronary artery disease)-

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीनं (Corona Positive without Mask) जर मास्क घातला नसेल तर 15 मिनिटे, कापडाचा मास्क घातला असेल तर 20 मिनिटे, सर्जिकल मास्क घातला असेल तर 30 मिनिटे आणि जर कोरोना संक्रमित व्यक्तीने N95 मास्क घातला असेल तर 2.5 तासांनी त्याला कोरोनाचं संक्रमण होऊ शकते.

Ajit Pawar told to use N95 mask
Corona: मुंबईत एका दिवशी नव्या दहा हजार रुग्णांची भर

2. जर कापडाचा मास्क लावलेली व्यक्ती कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास (If a person wearing a cloth mask comes in contact with a coronary artery patient)-

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीनं जर मास्क घातला नसेल तर 20 मिनिटे, कापडाचा मास्क घातला असेल तर 27 मिनिटे, सर्जिकल मास्क घातला असेल तर 40 मिनिटे आणि जर कोरोना संक्रमित व्यक्तीने N95 मास्क घातला असेल तर 3.3 तासांनी त्याला कोरोनाचं संक्रमण होऊ शकते.

3. जर सर्जिकल मास्क लावलेली व्यक्ती कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास (If a person wearing a surgical mask comes in contact with a coronary artery patient)-

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीनं जर मास्क घातला नसेल तर 30 मिनिटे, कापडाचा मास्क घातला असेल तर 40 मिनिटे, सर्जिकल मास्क घातला असेल तर 1 तास आणि जर कोरोना संक्रमित व्यक्तीने N95 मास्क घातला असेल तर 3.3 तासांनी त्याला कोरोनाचं संक्रमण होऊ शकते.

Ajit Pawar told to use N95 mask
Omicron : शाळा, सलून, मॉल्ससह सर्व बंद; बंगालमध्ये कठोर निर्बंध

4. जर N95 मास्क लावलेली व्यक्ती कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास (If a person wearing an N95 mask comes in contact with a coronary artery disease)-

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीनं जर मास्क घातला नसेल तर 2.5 तास, कापडाचा मास्क घातला असेल तर 3.3 तास, सर्जिकल मास्क घातला असेल तर 5 तास आणि जर कोरोना संक्रमित व्यक्तीने N95 मास्क घातला असेल तर 25 तासांनी त्याला कोरोनाचं संक्रमण होऊ शकते.

वरील अभ्यासावरून इतर मास्कच्या तुलनेत N95 मास्क वापरल्यामुळे कोरोनापासून जास्त संरक्षण होऊ शकते, हे स्पष्ट होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com