sharad pawar
sharad pawar

NCP चा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का गेला? काय असतात निकष, जाणून घ्या...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्क बसला आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे हा पक्ष केवळ प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे. किमान चार राज्यांमध्ये पक्षाचे अस्तित्व असणे गरजेचे आहे. या सगळ्या नियमांमधून राष्ट्रवादी अपात्र ठरला आहे. केवळ राष्ट्रवादी पक्षच नाही तर आणखी काही पक्षांवर देखील ही कारवाई केली आहे. दरम्यान राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता कशी मिळते, हे आपण जाणून घेऊया...

  • संबंधित पक्षाचे राज्यसभेत किमान चार खासदार असणे बंधणकारक आहे.

  • ४ किंवा जास्त राज्यांत लोकसभा निवडणुकीत ६ टक्क्यांपेक्षा जास्त मतं आवश्यक असतात

  • विधानसभा निवडणुकांमध्ये सहा टक्क्यांपेक्षा जास्त मतं आवश्यक आहेत

  • तसेच चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता पाहिजे

sharad pawar
Amit Shah : सुईच्या टोकाएवढीही जमीन मिळणार नाही; अरुणाचल प्रदेशमधून शाहांचा चीनला इशारा

हे सर्व निकष पुर्ण केले तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. या सर्व निकषांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बसला नाही, त्यामुळे पक्षाचा राष्ट्रीय दर्जा आयोगाने काढून घेतला.

१० जानेवारी २००० ला राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. २०१४ पर्यंत दर्जा कायम होता. परंतु त्यानंतर पक्षाला आयोगाने नोटिसा पाठवल्या.

इतर राज्यांमधले अस्तित्व कमी झाल्याने निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. इतर राज्यातला प्रादेशिक पक्षांचा दर्जा कमी झाला आहे. निवडणूक आयोगाने काढलेली ऑर्डर १८ पानांची आहे.

sharad pawar
Election: फडणवीसांच्या निकटवर्तीयाकडे कर्नाटकात खास जबाबदारी; अयोध्या दौऱ्यानंतर मोहिमेवर रवाना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com