Sharad Pawar : शरद पवार हे गौतम अदानी यांच्या पाठीशी का राहतात त्याचं उत्तर त्यांनी आत्मचरित्रात सांगितलंय

आज आपण त्यांची आणि अदानींच्या मैत्रीविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
Sharad Pawar and Gautam Adani
Sharad Pawar and Gautam Adanisakal

Sharad Pawar and Gautam Adani : असं म्हणतात की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अदानी समुहाचे प्रमुख उद्योगपती गौतम अदानी यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. आता पुन्हा या गोष्टीचा प्रत्यय आलाय. हिंडेनबर्गनी आपल्या अहवालात अदानी उद्योग समुहावर केलेल्या आरोपांवर आता शरद पवार यांनी भाष्य केले.

शरद पवार म्हणाले, "आम्ही हिंडेनबर्गचे कधीही नाव ऐकले नव्हते. हिंडेनबर्ग अहवालात अदानींना फोकस करण्यात आल्याचे दिसतेय." "सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनंतर आता संयुक्त संसदीय समितीच्या नियुक्तीची आवश्यकता राहिली नाही", असंही शरद पवार म्हणाले. त्यांच्या या प्रतिक्रियेवरुन पुन्हा एकदा अदानींविषयींचा त्यांचा सॉफ्ट कॉर्नर दिसून आलेला आहे.

आज आपण त्यांची आणि अदानींच्या मैत्रीविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. (why ncp leader Sharad Pawar always support businessman Gautam Adani read what he said in his autobiography )

पवारांनी आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे. शरद पवार सांगतात, "गौतम अदानी या तरुण उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो आहे. कमालीचा कष्टाळू आणि साधा ! शून्यातून त्यानं आपलं आजचं साम्राज्य उभं केलं आहे. लोकलमध्ये काही छोट्या वस्तूंची विक्री करण्यापासून या माणसाच्या उद्योजकतेला सुरुवात झाली.

यानंतर काही छोटे व्यवसाय सुरू करून गौतम यांनी काही पैसे गाठीला बांधले. मग तो हिऱ्यांच्या व्यवसायात पडला. तिथेही पैसे मिळत होते, पण गौतम यांना त्याच्यात रस पायाभूत उभारणीच्या उद्योगात पडण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. यामधल्या काळात त्यांनी बंदर उभारणीचा पुष्कळ अभ्यास केला.

Sharad Pawar and Gautam Adani
Sharad Ponkshe: छत्रपती संभाजी महाराजांसोबत भयंकर अत्याचार सहन करणारा कोण होता हे लपवता कशाला..

गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेलांचे आणि त्यांचे चांगले संबंध होते. त्यांनी चिमणभाईकडे गुजरातमधलं मुंद्रा बंदर विकसित प्रस्ताव ठेवला. मुंद्रा वाळवंटी भागातलं बंदर आहे. तिथून पाकिस्तानची सीमारेषा नजीक आहे.

या वस्तुस्थितीची जाणीव चिमणभाईनी गौतम यांना दिली. गौतम यांनी प्रतिकूल परिस्थितीतही हे शिवधनुष्य पेललं. आज पन्नास हजार एकर जमिनीवरचं हे बंदर देशातलं सर्वात मोठं आणि अद्ययावत बंदर आहे. गौतम नंतर कोळसा पुरवण्याच्या व्यवसायातही आले." शरद पवार आपल्या चरित्रात सांगतात,  मी गौतमना सुचवलं, 'वीज प्रकल्पांसाठी कोळसा पुरवण्याबरोबर ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रातही तुम्हीच उतरा' 

एकदा प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त गोंदिया इथे गौतम अदानी आणि शरद पवार एकत्र आले होते. त्या वेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी, भंडारा जिल्ह्यात उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी शरद पवार यांनी मदत करावी, अशी भावना व्यक्त केली.

यावर शरद पवार म्हणाले, "उद्योग येतील, पण तुम्हालाही सहकार्य करावं लागेल. आज गौतम अदानी आले आहेत. त्यांनी मी विनंती करतो, की ऊर्जानिर्मितीसाठी या परिसरात त्यांनी प्रकल्प उभा करावा.

गौतमनीही त्यांच्या भाषणात त्यांच्या विनंतीला विधायक प्रतिसाद दिला. सर्वसाधारणपणे व्यासपीठांवरच्या वक्तव्यांतून फार काही घडतंच असं नाही. पण गौतमनी हा विषय लावून धरला.

त्यांनी भंडाऱ्यात ऊर्जानिर्मिती प्रकल्प मार्गी लावला. गौतम यांनी ऊर्जानिर्मिताच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली. आज जवळपास बारा हजार मेगावॅट वीजनिर्मितीने त्याचे प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेत आहेत.

Sharad Pawar and Gautam Adani
Adani Total Gas: अदानी टोटल गॅसने CNG-PNG च्या दरात केली मोठी कपात, मध्यरात्री 12 पासून नवीन दर लागू

यावरुन हे लक्षात येते की त्यांची मैत्र किती दृढ आहे. राजकारणात वावरत असताना अनेकदा अदानी त्यांच्या विरोधातही उभे होते. महाराष्ट्राच्या वीजसंकटाच्या वेळी अनेकदा गौतम अदानी व्हिलन ठरले. शरद पवारांचं सरकार असताना अदानींवर केंद्र सरकार त्यांची विशेष मदत करत असल्याचाही आरोप करण्यात आला होता.

राजकीय कारकिर्दीतील लहान मोठ्या चढउतारामुळे अनेकदा शरद पवार आणि अदानी एकमेकांच्या विरोधात होते पण त्यामुळे त्यांच्या मैत्रीवर आणि सलोख्याच्या नात्यावर कधीच परिणाम झाला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com