दरेकरांनंतर 'हा' भाजप नेता निशाण्यावर; मंत्री असतानाच्या कामांची होणार चौकशी

संबंधित खात्याच्या सर्व कामांची विशेष समितीमार्फत होणार चौकशी
BJP
BJPsakal

मुंबई : मुंबै बँक प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर मुंबई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यानंतर आता माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (ChandraShekhar Bavankule) यांच्या कामाची महाविकास आघाडीकडून चौकशी करण्यात येणार आहे, एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे. (will be an inquiry of work done while Chandrashekhar Bavankule was a minister)

BJP
सोनिया गांधी अ‍ॅक्शन मोडमध्ये; पराभवानंतर घेतला मोठा निर्णय

या वृत्तात म्हटलं की, सन २०१४ ते २०१९ या पाच वर्षातील बावनकुळे यांच्या सर्वच कामांची चौकशी महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात येणार आहे. ९ नोव्हेंबर २०२१ मध्ये ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भात एक बैठकही घेतली. या बैठकीत संचालक महावितरण, संचालक महावितरण संचलन आणि कार्यकारी संचालक संचलन अशा तीन जणांची समितीकडं ही चौकशी सोपवण्यात आली आहे. महावितरणमधील ५२ विविध तपशीलांची तपासणी करण्यात येणार असून एक महिन्यात याचा अहवाल त्यांना द्यावा लागणार आहे. यामध्ये आर्थिक, प्रशासकीय, तांत्रिक, आऊटपुट तसेच टेंडर बाबतीतील सर्वंकष चौकशी केली जाणार आहे. या सर्वांचा अहवाल एका महिन्यात राज्य शासनाकडे सादर करायचा आहे.

BJP
युपीत 304 जागांसह आम्हीच विजयी; अखिलेश यांचा दावा

नितीन राऊत आणि चंद्रशेखर बावनकुळे या आजी-माजी ऊर्जा मंत्र्यांमध्ये महावितरणच्या कामांवरुन सातत्यानं तुतूमैमै सुरु आहे. सन २०१४ ते २०१९ या भाजप कार्यकाळात महावितरणची थकबाकी वाढली तसेच पायाभूत कामंही झाली. याच कामांची चौकशी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com