Uddhav Thackeray: मोगँबोच्या पिढ्या जरी उतरल्या तरी...; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे गटाकडून मराठी भाषा दिनी आयोजित जागर मराठी भाषेचा कार्यक्रमात त्यांनी राजकीय फटकेबाजी केली.
Uddhav thackeray faction symbol
Uddhav thackeray faction symbol esakal

मुंबई : उद्धव ठाकरे गटाकडून मराठी भाषा दिनी आयोजित जागर मराठी भाषेचा कार्यक्रमात त्यांनी राजकीय फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. शिवसेना आमच्याकडून कोणी चोरु शकत नाही अगदी मोगँबोच्या पिढ्या जरी उतरल्या तरी ते शक्य नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. (Even generations of Mogambo come no one can stole ShivSena from us Thackeray slams on CM Shinde)

Uddhav thackeray faction symbol
Chatrapti Sambhaji Nagar: अखेर जिल्ह्यांचही झालं नामांतर! 'छत्रपती संभाजीनगर', 'धाराशीव'चं निघालं नोटीफिकेशन

उद्धव ठाकरे म्हणाले, "शिवसेना म्हणजे नाव किंवा चिन्ह नाही. केवळ धनुष्यबाण म्हणजे शिवसेना नाही. शिवसेना ही आपली आहेच ती कोणी चोरु शकत नाही. शिवसेनाप्रमुखांनी जे पेरलं आहे ते तुम्ही आमच्यातून कसं काढाल? जे आमच्या रगारगात-नसानसात भिनलेलं आहे. ही शिवसेना कोणाच्याही अगदी मोगँबोच्या पिढ्या जरी उतरल्या तरी कोणीही चोरु शकत नाही"

Uddhav thackeray faction symbol
Raj Thakceray: एकमेव आमदारानं पक्ष ताब्यात घेतला तर? राज ठाकरेंनी दिलं उत्तर

मिस्टर इंडिया चित्रपटात विलन मोगँबोचा एक किस्सा आहे. त्यामध्ये तो काळा बाजार करा, किंमती वाढवा, मारामाऱ्या-दंगलीद्वारे माणसांना लढवत राहा. आमचं आम्ही राज्य करत राहू असं म्हटलं आहे. त्याच दिशेनं आपला देश चाललाय की नाही हा तुम्ही विचार करायचा आहे. आपल्याला एकमेकांत लढवत रहायचं, हाच यांचा उद्योग आहे, अशा शब्दांत त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com