‘महिला सुरक्षा’ प्रकल्प एक मेपासून राज्यात

शंभूराज देसाई; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्‌घाटन
Women safety project
Women safety projectsakal

कऱ्हाड : शालेय व महाविद्यालयीन मुलींच्या स्वसंरक्षणासाठी जिल्ह्यात यशस्वीपणे राबविलेला महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प एक मेपासून राज्यात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्‌घाटन होणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात प्रकल्प राबविण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे.

गृहराज्यमंत्री देसाई यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांबरोबर मुंबईतून व्हिसीद्वारे संवाद साधला. त्यावेळी मंत्री देसाई बोलत होते. यावेळी गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे उपस्थित होते. मंत्री देसाई म्हणाले, ‘‘राज्यातील प्रत्येक शाळेतील मुलींना त्यांच्यासाठी असणाऱ्या कायद्यांची माहिती देवून स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे. त्यांच्यात आपले स्वसंरक्षण स्वत: करू शकतात, असा आत्मविश्वास निर्माण करा. जिल्ह्यामध्ये महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राबविताना एक आराखडा तयार करा. विविध विभागांचा सहभाग घेऊन या प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात जनजागृती करा. या प्रकल्पात जास्तीत जास्त शालेय, महाविद्यालयीन मुलींचा सहभाग घ्यावा.’’

श्री. बन्सल म्हणाले, ‘‘जिल्ह्यात महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प गृहराज्यमंत्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला आहे. महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पांतर्गत स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. त्यामुळे आमच्यात आत्मविश्वास वाढला आहे, असे त्या मुलीने सांगितले. महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पामुळे मुलींमध्‍ये कमालीचा आत्मविश्वास वाढला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com