
विराज ग्रुपमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून दोन गटांत युनियन स्थापन करण्यावरून वाद सुरूय.
पालघरमध्ये कंपनीतील दोन गटात तुफान दगडफेक; अनेक पोलीस कर्मचारी जखमी
पालघर : येथील विराज ग्रुपमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून दोन गटांत युनियन स्थापन करण्यावरून वाद सुरूय. त्याचं पर्यवसन आज दगडफेकीत झालंय. बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील (Boisar Tarapur Industrial Area) विराज अलॉय प्लांटमध्ये (Viraj Alloys Plant) कामगारांकडून तुफान दगडफेक करण्यात आलीय. दोन कामगार युनियनमध्ये (Trade union) वाद झाल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जातंय.
या दगडफेकीत बंदोबस्तासाठी असलेले 12 पोलीस कर्मचारी जखमी असल्याची माहिती आहे. पालघरमधील (Palghar) विराज ग्रुपच्या विराज अलॉय कंपनीमध्ये युनियन स्थापन करण्यावरून दोन गटात वाद झाला आहे. या नंतर झालेल्या वादामध्ये कंपनीमधील काही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडलीय.
हेही वाचा: सहारनपूर : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; दोन भावांसह चार जण ठार
या घटनेमध्ये पोलीस मध्यस्थी करण्यासाठी गेले असता, काही पोलिसांनाही मारहाण झालीय. त्यामुळं हे प्रकरण अधिकच चिघळलं असून मोठा पोलिसांचा (Police) फौजफाटा विराज कंपनीच्या दिशेनं निघालाय. दरम्यान, आज झालेल्या या दगडफेकीत अनेक कामगारही जखमी झाले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच सुमारे 300 पोलिसांचा फौजफाटा या कंपनीमध्ये पोहोचला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याची माहिती मिळत आहे.
Web Title: Workers Throw Stones At Viraj Alloys Plant In Boisar Tarapur Industrial Area 12 Policemen Injured
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..