YIN
YINSakal

"यिन" च्या निवडणुकीची घोषणा

उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

मुंबई : राज्यात तरुणाईला उत्सुकता असलेली ‘यिन’ ची निवडणूक आजपासून सुरू होत आहे. महाविद्यालयीन तरुणाईला आजपासूनच उमेदवारी अर्ज भरता येतील. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ‘सकाळ’ माध्यम समूहाचे ‘यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क’ अर्थात (यिन) च्या ॲपवरून ऑनलाइन राबविली जाणार आहे.

सर्वच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्‍वगुण विकसित करतांना त्‍यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे महत्त्वपूर्ण काम ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क’ अर्थात (यिन) या व्‍यासपीठाद्वारे केले जाते. यिनच्या माध्यमातून नेतृत्व विकास कार्यक्रम अर्थात निवडणुक व मतदान प्रक्रिया ॲपवरून ऑनलाइन पद्धतीने पार पाडली जाणार आहे. निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी या व्यासपीठाकडे नेतृत्व विकासाचे व्यासपीठ म्हणून पाहतात.
नेतृत्व विकासाच्या निवडणुका घेत, महाराष्ट्र राज्याचे शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळ दरवर्षी तयार होते. महाविद्यालयीन अध्यक्षापासून, जिल्हा अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री निवडला जातो. तसेच या मंत्रिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात येते. सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून नेतृत्वविकास ही प्रक्रिया देशामध्ये पहिल्यांदाच महाविद्यालयीन तरुणाईसाठी सकाळ माध्यम समूहाच्या ''यिन'' ने सुरू केली आहे.

YIN
नवाबभाई वेल डन : मुख्यमंत्री ठाकरे


पहिल्या टप्प्यातील जिल्हानिहाय वेळापत्रक :
नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, नागपूर, वर्धा, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशिम, नांदेड, सोलापूर कोल्हापूर, रत्नागिरी, अहमदनगर.

उमेदवारी अर्ज दाखल करणे : ११ ते २० नोव्हेंबर
उमेदवार यादी जाहीर करणे : २१ नोव्हेंबर
प्रचार कालावधी : २६ नोव्हेंबर
मतदानाची तारीख (ऑनलाइन) : २७ नोव्हेंबर
निकाल : २ डिसेंबर

चौकट :
दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक :
धुळे, नंदुरबार, लातूर, बीड, परभणी, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नवी मुंबई, मुंबई, यवतमाळ, बुलढाणा, पिंपरी- चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण, हिंगोली, उस्मानाबाद, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा.

उमेदवारी अर्ज दाखल करणे : ११ ते २२ नोव्हेंबर
उमेदवार यादी जाहीर करणे : २३ नोव्हेंबर
प्रचार कालावधी (ऑनलाइन): २३ ते २८ नोव्हेंबर
मतदान : ३० नोव्हेंबर
निवडणुकीचा निकाल : २ डिसेंबर

चौकट :
असा भरा उमेदवारी अर्ज
‘यिन’मध्ये सहभागी होण्यासाठी व आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुगल प्ले स्टोअरला भेट द्या आणि सकाळ माध्यम समूहाचे Young Inspirators Network हे ॲप डाऊनलोड करा. अन्यथा सोबत दिलेला QR कोड स्कॅन करा.

(कोट)
यिनच्या माध्यमातून अवघे राज्य व्यापले आहे. तरुणाईला दिशा देण्याचे काम यिनकडून सातत्याने होत आहे. नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक तरुण घडत आहे. मी यिनच्या सर्व उपक्रमात सहभागी होतो. आजपासून होणाऱ्या महाविद्यालयीन निवडणुकांसाठी माझ्या शुभेच्छा. तरुणाई आणि महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवावा.

- उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com