
आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून राजकारण पाहत आहे. ते पाहत-पाहत राजकारणात आलो आहे. त्यानंतर आता अशाचप्रकारे युवकांनीही राजकारणात यावे.
- उद्धव ठाकरे, शिवसेना, पक्षप्रमुख
मुंबई : आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून राजकारण पाहत आहे. ते पाहत-पाहत राजकारणात आलो आहे. त्यानंतर आता अशाचप्रकारे युवकांनीही राजकारणात यावे, अशी अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवार) केली. तसेच दडपण नको म्हणून आदित्य ठाकरे यांच्यासोबत नव्हतो, असेही ते म्हणाले.
'मातोश्री' येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, वरळीतून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही उमेदवारी देत असताना शिवसैनिकांनी त्यांना स्वीकारले आहे. त्याला कोणताही विरोध केला नाही. त्यामुळे मी सर्व शिवसैनिकांना धन्यवाद देतो. तसेच ज्यावेळी निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेनेने कोणाला विरोध केला नाही. आमची पिढी स्वप्न पाहत पुढे गेली. आताही युवकांनी पुढे येऊन राजकारण, महाराष्ट्र घडवला पाहिजे.
Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटील अडकणार मतदारसंघात, कारण...
8 तारखेला अधिक बोलणार
येत्या 8 तारखेला दसरा मेळाव्यात पुढील राजकीय गोष्टींवर भाष्य करणार आहे, असे म्हणत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
चंद्रकांत रघुवंशी यांचा शिवसेनेते प्रवेश
नंदूरबारमधील काँग्रेसचे विधान परिषद सदस्य असलेले चंद्रकांत रघुवंशी यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.