

Esakal
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांमध्ये भाजपने पुन्हा एकदा सर्वाधिक जागा जिंकत सामनावीराचा किताब पटकावला. भाजपने बारापैकी पाच ठिकाणी निर्भेळ यश मिळविले, तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन जिल्हा परिषदांमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत महापालिका निवडणुकीतील पराभवाची परतफेड केली. येथे पक्षाच्या पाठीशी मोठी सहानुभूतीची लाट पाहायला मिळाली. काँग्रेसने सांगली, कोल्हापूर आणि लातूरमध्ये ताकद दाखवून दिली, पण नंतर मात्र बहुमतापासून दूर राहिल्याने त्यांच्या वाट्याला एकही जिल्हा परिषद येऊ शकली नाही.