12th Fail Collection Day 14 : कोण म्हणतं 'फेल' झाला, त्यानचं मोठा खेळ केला! '50 कोटीं'च्या जवळ आला

सोशल मीडियावर देखील १२ वी फेलची चर्चा आहे. चित्रपटावर समीक्षकांच्या आलेल्या प्रतिक्रिया या चित्रपटाविषयी खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत.
12th Fail Day 14 Box Office Collection
12th Fail Day 14 Box Office Collectionesakal

12th Fail Day 14 Box Office Collection - प्रसिद्ध दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या आजवरच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. कथेची प्रभावी मांडणी, खिळवून ठेवणारी शैली आणि कलाकारांची योग्य निवड यामुळे विधू चोप्रा यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.

सध्या चोप्रा यांच्या १२ वी फेलची जोरदार चर्चा आहे. विक्रांत मेस्सी, मेधा शंकर, प्रियांशू चॅटर्जी, संजय बिष्णोई, अंशुमन पुष्कर या कलाकारांच्या दमदार अभिनयानं १२ वी फेलची उंची आणखी वाढली आहे. या चित्रपटाच्या बरोबरीनं प्रसिद्ध अभिनेत्री कंगनाचा तेजस प्रदर्शित झाला होता. मात्र १२ वी फेलनं तेजसला आपल्या प्रभावानं गारद केल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक दिवसागणिक या चित्रपटानं आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. 12th Fail Movie collection 14 day Vidhu Vinod Chopra Vikrant Massey

सोशल मीडियावर देखील १२ वी फेलची चर्चा आहे. चित्रपटावर समीक्षकांच्या आलेल्या प्रतिक्रिया या चित्रपटाविषयी खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. अशावेळी नेटकऱ्यांनी, प्रेक्षकांनी देखील त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.विक्रांत मेस्सीच्या अभिनयाच कौतुक केले आहे. बारावी नापास होणाऱ्या मनोज कुमार शर्माचा आयपीएस होण्यापर्यतचा प्रवास मोठ्या प्रभावीपणे या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. प्रेक्षकांना तो भावला आहे.

१२ वी फेल प्रदर्शित होऊन आता दोन आठवडे झाले असले तरी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी खेचून घेताना दिसतो आहे. ५० कोटींच्या जवळ १२ वी फेल येऊन ठेपला असून त्याच्या या कामगिरीवर चाहते, प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. २७ ऑक्टोबर रोजी १२ वी फेल प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं कंगनाचा तेजस अन् थलापती विजयच्या लिओला जोरदार टक्कर दिली आहे.

12th Fail Day 14 Box Office Collection
12 th Fail Movie Review : रक्ताचं पाणी केल्याशिवाय यश मिळणार नाही! बारावी नापास झालेला 'तो' शेवटी IPS झाला की नाही?

सॅकनिकच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं १४ व्या दिवशी सव्वा कोटींची कमाई केली आहे. १३ व्या दिवशी देखील त्यानं पावणे दोन कोटी कमावले होते. आतापर्यत विक्रांत मेस्सीच्या या चित्रपटानं २८ कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

12th Fail Day 14 Box Office Collection
Shyamchi Aai Review: श्यामची आई पाहायला जाताय? तर मग हे एकदा वाचाच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com