अक्षयकुमारचे भयावह रुप; 2.0 चा ट्रेलर लाँच

वृत्तसंस्था
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला 2.0 चा ट्रेलर आज (शनिवार) लाँच झाला आहे. 2.0 ची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर आज अखेर या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. 2.0 हा चित्रपट भारतातील आत्तापर्यंतचा सर्वांत महागड्या बजेटचा चित्रपट असणार आहे.

2010 मध्ये लाँच झालेल्या 'रोबोट' चित्रपटात रजनीकांत आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांची प्रमुख भूमिका होती. या 'रोबोट'चा सिक्वल 2.0 चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. शंकर यांनी केले तर निर्मिती सुबास्करन अल्लीराजाह यांनी केली. 2.0 ट्रेलर लाँच करण्यासाठी एक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये हा ट्रेलर लाँच करण्यात आला. तसेच या कार्यक्रमामध्ये रजनीकांत, संगीतकार ए. आर. रेहमान, अभिनेता अक्षय कुमारने उपस्थिती लावली होती. यापूर्वी 2.0 चा टिझर लाँच करण्यात आला होता. या टिझरला अवघ्या 24 तासांत 3.20 कोटी व्ह्यूज मिळाले होते. 2.0 हा चित्रपट तमिळ, हिंदी या भाषांसह इतर 13 भाषांमध्ये रिलिज करण्यात येणार आहे. 

2.0 या चित्रपटात रजनीकांत, अक्षय कुमार यांच्यासह अॅमी जॅक्सनची भूमिका असणार आहे. त्यामुळे या ट्रेलरनंतर आता चित्रपट केव्हा प्रदर्शित याकडे चित्रपट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2.0 Trailer Launch Rajinikanth Akshay Kumar starrer released