"निमकी मुखिया'चे 200 भाग पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

स्टार भारत वाहिनीवरील लेखक जमा हबीब यांची मालिका "निमकी मुखिया' या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेने नुकतेच 200 भाग पूर्ण केले. या निमित्ताने या मालिकेच्या संपूर्ण टीमने मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन केले. त्यावेळी जमा हबीब, इशरत जमा हबीब, भूमिका गुरुंग, अभिषेक शर्मा, इंद्रनील सेनगुप्ता, गरिमा श्रीवास्तव, विजय कुमार, रिता भादुरी, रिषी खुराना, करण सिंग, जतीन सुरी, दिग्दर्शक राकेश कुमार, पुनीत सिंग, बरखा बिष्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, सपना मल्होत्रा, भैरवी रायचुरा, जितेन लालवानी, सुरज थापर, दीप्ती ध्यानी ही मंडळी या सेलिब्रेशनला उपस्थित होते. 

निमकी मुखिया या मालिकेची कथा बिहारमधील एका गावातील एका चुलबुली मुलीवर आधारीत आहे. तिचे नाव निमकी असून ती एका गरीब घरातील आहे. पण तिची स्वप्ने फार मोठी आहेत. गावात सरपंचाच्या निवडणुकीत निमकी जिंकते. तिचा प्रवास या मालिकेत रेखाटण्यात आला आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता मालिका स्टार भारत वाहिनीवर प्रसारीत होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 episodes completed of nimaki mukhiya