युवा पिढीचा ‘३६ गुण’लवकरच चित्रपटगृहात

युवा पिढीचा ‘३६ गुण’लवकरच चित्रपटगृहात

मुंबई : एखादा विषय रुपेरी पडद्यावर अगदी खुलवून मांडणे हे दिग्दर्शक समित कक्कडला बरोबर जमते. म्हणून त्याचे ‘हाफ तिकीट’, ‘आयना का बायना’ आदी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. युवा पिढीला डोळ्यासमोर ठेवून चित्रपट काढणारा हा दिग्दर्शक आता नवी कथा घेऊन येत आहे. ‘३६ गुण’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

आताच्या लग्नसंस्था आणि तरुण पिढीचा प्रत्येक नातेसंबंधाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांची मानसिकता या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे पहिलवहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. तसेच हृषिकेश कोळीने या चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी पेलली आहे.

या चित्रपटाची खासियत म्हणजे मुंबई आणि लंडनमधील तब्बल ९० ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. म्हणजेच मराठी प्रेक्षकांना लंडनमधील नयनरम्य दृश्‍ये पाहता येणार आहेत. एकूणच काय; तर ‘३६ गुण’ सिनेरसिकांसाठी मनोरंजनाची उत्तम मेजवानी घेऊन येत आहे. 

web title : 36 gun marathi movie to release soon

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com