दोन केळी 442 रुपयांना देणाऱ्या हॉटेलला एवढ्या रुपयांचा दंड

वृत्तसंस्था
रविवार, 28 जुलै 2019

अभिनेता राहुल बोसला ज्या हॉटेलने दोन केळांचे 442 रुपये बिल लावले होते, त्या हॉटेलवर सीमाशुल्क विभागाने कारवाई केली असून हॉटेलला तब्बल 25000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मुंबई : अभिनेता राहुल बोसला ज्या हॉटेलने दोन केळांचे 442 रुपये बिल लावले होते, त्या हॉटेलवर सीमाशुल्क विभागाने कारवाई केली असून हॉटेलला तब्बल 25000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दरम्यान, राहुल बोसने एका स्वतःसाठी दोन केळी ऑर्डर केली होती. वेटर केळी घेऊन आला आणि बिलंही घेऊन आला. या दोन केळींचे बिल बघून राहुल चाट पडला होता. फक्त दोन केळींचे 442 रूपये बिल आले होते.

दोन केळींचे बिल पाहून चक्रावला राहुल बोस

यानंतर, राहुलने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबद्दलचा एक व्हिडिओ शेअर केला होता. माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर हे बघा. फळे तुमच्या आयुष्यासाठी हानीकारक नाहीत, असे कोण म्हणेल? या हॉटेलला विचारा..., असे तो या व्हिडिओत म्हणताना दिसत होता. सर्वच स्तरातून याची दखल घेण्यात आल्यानंतर सीमाशुल्क विभागानेही याची दखल घेत हॉटेलला 25000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5-star fined Rs 25000 for charging actor Rahul Bose Rs 442 for 2 bananas