International Film Festival: 'कांतारा' पासून ते 'द केरळ स्टोरी' पर्यंत हे चित्रपट वाढतील 54 व्या IFFI महोत्सवाची शान!

नुकतीच IFFIची घोषणा करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा चित्रपट महोत्सव होणार आहे. यावेळी चित्रपट महोत्सवाची ही 54 वी आवृत्ती आहे.
International Film Festival:
International Film Festival: Esakal

International Film Festival Of India: 1952 मध्ये सुरू झालेला IFFI हा आशियातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा चित्रपट महोत्सव मानला जातो. हा महोत्सव दरवर्षी गोव्यात आयोजित केला जातो जिथे सर्वोत्तम चित्रपट दाखविले जातात. गोवा सरकार, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन करते.

नुकतीच IFFIची घोषणा करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा चित्रपट महोत्सव होणार आहे. यावेळी चित्रपट महोत्सवाची ही 54 वी आवृत्ती आहे.

आता या महोत्सवात दाखवल्या जाणार्‍या 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन फीचर फिल्म्सची यादी नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने जाहीर केली आहे. आता या चित्रपट महोत्सवात कोणकोणत्या भारतीय चित्रपटाचा सामावेश आहे याकडे नजर टाकूया.

विषेश म्हणजे मल्याळम चित्रपट 'अट्टम' ने या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये दाखवल्या जाणार्‍या चित्रपटांमध्ये हिंदी आणि इतर भाषांमधील काही लोकप्रिय चित्रपटांची निवड केली जाते. जी दिग्दर्शक-निर्माता टीएस नागभरन यांच्या नेतृत्वाखाली असलेली 12 सदस्याची ज्युरी टिम करते.

International Film Festival:
Gautami Deshpande - Virajas Kulkarni: गौतमी देशपांडे - विराजस कुलकर्णी पुन्हा एकत्र, दसऱ्याच्या मुहुर्तावर घोषणा

आता यामध्ये 'कांतारा', 'सिर्फ एक बंदा काफी है', 'गुलमोहर', 'पोनीयिन सेल्वन 2', 'द केरळ स्टोरी', 'विदुथलाई पार्ट 1' आणि ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवला जाणारा '2018 ' हे सिनेमे प्रामुख्याने असणार आहेत.

फीचर फिल्म्समध्ये आरारीरारो, आट्टम , अर्धांगिनी , डीप फ्रिज , धाई आखर , इरट्टा , काढाल एनबाथू पोथू उदमाई , कथल ,कांतारा, मलिकाप्पुरम , मंडली यांचा समावेश आहे. मीरबीन , नीला नीरा सूरियान, नना थान केस कोडू , पुक्कलम , रवींद्र काब्य रहस्य , सना , द वॅक्सिन वॉर, वध,विदुथलाई पार्ट 1 यांचीही निवड करण्यात आली आहे.

International Film Festival:
Dharmendra on Kissing Scene: "माझ्या एका किसिंग सीनने खळबळ...." पुन्हा बोलले धर्मेंद्र

1947: ब्रेक्झिट इंडिया, अँड्रो ड्रीम्स , बासन , बॅक टू द फ्यूचर, बरुआर क्सॉन्गक्सर, बेहरूपिया - द इम्पर्सोनेटर , भंगार, नानसेई निलम, छुपी रोह,गिद्ध, कथाबोर , लचित , लास्ट मीट , लाइफ इन लूम , माऊ: द स्पिरिट ड्रीम्स ऑफ चेराव, प्रदक्षिणा , सदाबहार , श्री रुद्रम, द सी अँड सेव्हन व्हिलेज आणि उत्सवमूर्ती हे चित्रपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. 'अँड्रो ड्रीम्स' हा मणिपुरी चित्रपट भारतीय पॅनोरमामधील नॉन-फीचर श्रेणीतील पहिला चित्रपट असणार आहे.

International Film Festival:
Gauhar Khan : 'बॉलीवूडचा तो प्रसिद्ध अभिनेता हात सोडायला तयारच नव्हता, त्यानं...' गौहरनं सांगितली 'त्या' सुपरस्टारची गोष्ट

नॉन-फीचर फिल्म ज्युरीमध्ये 6 सदस्य होते, ज्याचे नेतृत्व डॉक्युमेंटरी फिल्म्सचे दिग्दर्शक अरविंद सिन्हा यांनी केले.

यंदा इफ्फी चित्रपट महोत्सवात दाखवल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर यात उत्सवमूर्ती, प्रदक्षिणा आणि भंगार या चित्रपटांचा सामावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com