Dharmendra on Kissing Scene: "माझ्या एका किसिंग सीनने खळबळ...." पुन्हा बोलले धर्मेंद्र

धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. मात्र, त्यांच्या लिपलॉकवरून बराच वाद झाला होता.
 Dharmendra-Shabana Azmi Kissing Scene
Dharmendra-Shabana Azmi Kissing Sceneesakal

Dharmendra on Kissing Scene with Shabana Azmi: बॉलीवूडच्या हि-मॅन म्हणुन प्रसिद्ध असलेले धर्मेंद्र आजही तितकेच लोकप्रिय आहेत. त्यांची नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा असतेच. धर्मेंद्र काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसले.

धर्मेंद्र आणि शबाना यांच्या जोडीने या चित्रपटात लाईमलाईट मिळवली. या चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा किसिंग सीन दाखवण्यात आला आणि त्यामुळे चांगल्याच चर्चा रंगल्या. या किसिंग सीनची इतकी चर्चा झाली की त्यानंतर अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या.

 Dharmendra-Shabana Azmi Kissing Scene
Gautami Deshpande - Virajas Kulkarni: गौतमी देशपांडे - विराजस कुलकर्णी पुन्हा एकत्र, दसऱ्याच्या मुहुर्तावर घोषणा

आता त्यातच या सीनबद्दल बोलताना धर्मेंद्र यांनी या सीनची तुलना त्यांचा नातू राजवीर देओलच्या 'दोनो' चित्रपटात दिसलेल्या किसिंग सीनसोबत केली आहे. त्यामुळे पुन्हा ते चर्चेत आले आहेत.

धर्मेंद्र नुकतेच एका कार्यक्रमात स्पॉट झाले होते. यावेळी त्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील स्वतःच्या आणि शबाना आझमीच्या किसिंग सीनबद्दल बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

याबद्दल बोलताना ते म्हणाले की, 'प्रेक्षकांशी जोडलेले राहण्याचे आमचे उत्तम माध्यम हे चित्रपट आहे. मात्र, मी अशाच भूमिका निवडतो, माझ्याशी एकरूप होतात.'

 Dharmendra-Shabana Azmi Kissing Scene
Mallika Sherawat Bday : 'लोकांचं फार मनावर घ्यायचं नसतं'! 5 कोटींच्या कारमधून फिरणारी 'मल्लिका' खऱ्या आयुष्यातही राणीच

पुढे, धर्मेंद्र म्हणाले, 'माझ्या नातू राजवीर देओलने त्याच्या चित्रपटात किती किती किसिंग सीन घेतले आहेत हे मला माहित नाही, परंतु माझ्या एका किसिंग सीनने खळबळ उडवून दिली.'

'रॉकी और रानी की प्रेम कहानी'पूर्वीही धर्मेंद्र यांनी स्क्रीनवर किसिंग सीन केले होते. अनुराग बसूच्या 'लाइफ इन अ मेट्रो'मध्ये त्यांनी नफिसा अलीसोबत या किसिंग सीन केले होते, ज्याचे लोकांनी कौतुकही केले होते. मात्र रॉकी और राणी की प्रेम कहानी मधील त्यांच्या या सीन नंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती.

 Dharmendra-Shabana Azmi Kissing Scene
Malaika -Arjun : 'बेबी मी कायमच तुझ्या पाठीशी'! अर्जुननं मलायकाला विश करत ब्रेक अपच्या चर्चांना दिला पूर्णविराम

तर दुसरीकडे या सीनबाबत बोलताना शबाना आझमी म्हणाल्या, 'असं केल्याने एवढा गदारोळ होईल असं मला वाटले नव्हतं. स्क्रीनवर सीन आल्यावर लोक हसायला लागतात आणि हुंदके मारायला लागतात. मात्र सीन शुट करताना आम्ही याचा विचार केला नव्हता.' पुढे त्या म्हणाल्या, 'मी पडद्यावर जास्त किसिंग सीन केलेले नाहीत, पण धर्मेंद्र सारख्या देखण्या माणसाला किस करायला कोणाला आवडणार नाही.'

धर्मेंद्र यांच्या वक्रफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ते आता शाहिद कपूर, क्रिती सेनन आणि डिंपल कपाडियासोबत एका रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव 'अॅन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी' आहे. हा चित्रपट 9 फेब्रुवारीला रिलिज होईल. त्याचबरोबर धर्मेंद्र 'अपने 2' चित्रपटात सनी देओल आणि बॉबी देओलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com