esakal | 6 years for Baahubali: 'या' कारणांमुळे सुपरहिट ठरला 'बाहुबली'
sakal

बोलून बातमी शोधा

 baahubali the beginning

6 years for Baahubali: 'या' कारणांमुळे सुपरहिट ठरला 'बाहुबली'

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

भारतीय चित्रपटसृष्टीचे नाव जगभरात उंचवणारा चित्रपट 'बाहुबली'चा पहिला भाग म्हणजेच 'बाहुबली द बिगिनिंग' (baahubali the beginning) प्रदर्शित होऊन सहा वर्षे झाली. या चित्रपटातमधील प्रभास ,अनुष्का शेट्टी,सत्यराज, राणा दग्गुबाती ,रम्या कृष्णन या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 'बाहुबली द बिगिनिंग' हा जगभरात ६५० कोटी रूपयांची कमाई केलेला पहिला दक्षिणात्य चित्रपट ठरला. हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस का पडला ते जाणून घेऊयात (6 years of baahubali the beginning reasons behind its success)

व्हिज्युअल इफेक्ट्स (visual effects)

'बाहुबली द बिगिनिंग' या चित्रपटातील दृष्य जणू प्रेक्षकांसाठी पर्वणीच होती. हा चित्रपट बिग बजेट होता, कारण बरेच पैसे हे मोठे सेट्स आणि व्हिज्युअल इफेक्टवर खर्च झाले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स आणि सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारा हा पहिला तेलुगू चित्रपट आहे.

एस एस राजामौली यांची क्रिएटिव्ह कथामांडणी

चित्रपट निर्माते एस एस राजामौली हे चित्रपटसृष्टीमध्ये बिग बजेट चित्रपटांसाठी ओळखले जातात. 'बाहुबली द बिगिनिंग' या चित्रपटातील त्यांच्या क्रिएटिव्ह कथामांडणीमुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

baahubali the beginning

baahubali the beginning

प्रभास आणि तमन्ना यांचा अभिनय

चित्रपटामधील अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री तमन्ना यांच्यामधील केमिस्ट्रीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या दोघांचा अभिनयाबरोबरच चित्रपटातील रोमान्स देखील प्रेक्षकांना आवडला होता.

उत्कृष्ट कथा

'बाहुबली द बिगिनिंग' या चित्रपटाची कथा ही शिवुडू या मुलावर आधारलेली आहे. या चित्रपटात शेवटी कट्टप्पा बाहूबलीला मारतो. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्व प्रेक्षकांना एकच प्रश्न पडला होता की ‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं?’. या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी ‘बाहुबली २’ प्रदर्शित करण्यात आला. ‘बाहुबली २’ने देखील बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली.

'बाहूबली द बिगिनिंग' या चित्रपटाला सहा वर्षे झाल्याने अभिनेता प्रभासने सोशल मीडियावर खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो स्वतःच्या हाताने विशालकाय शिवलिंग उचलताना दिसत आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिले, '#6YearsOfBaahubali: ही ती टीम आहे ज्यांनी संपूर्ण देशात आणि जगभरात सिनेमाचा जादू पसरवला होता.'

हेही वाचा: #BoycottToofaan:फरहानचा 'तुफान' वादाच्या भोवऱ्यात

हेही वाचा: घटस्फोटानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसले आमिर-किरण

loading image