esakal | #BoycottToofaan:फरहानचा 'तुफान' वादाच्या भोवऱ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

farhan akhtar film boycott toofaan trended on twitter

#BoycottToofaan:फरहानचा 'तुफान' वादाच्या भोवऱ्यात

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरचा (bollywood actor farhan akhtar) तूफान (toofan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात फरहाननं एका बॉक्सरची भूमिका साकारली आहे. बॉक्सर अझीझ अलीच्या जीवनावर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. फरहानचा हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या सोशल मीडियावर #Boycott Toofaan असा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. फरहानच्या या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी काही नेटकरी करत आहेत. याचे कारण या चित्रपटात दाखवण्यात आलेली 'लव्ह स्टोरी' हे आहे. (farhan akhtar film boycott toofaan trending on twitter)

तूफान चित्रपटामधील अझीझ आणि डॉ. पूजा शहा या दोघांची लव्ह स्टोरी नेटकऱ्यांना आवडली नाही. हे ‘देशाच्या संस्कृतीच्या विरोधात आहे’, असं म्हणत या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकरी करत आहेत. ट्विटरवर एका यूझरने पोस्ट केली आहे, 'तूफान चित्रपट आमच्या संस्कृतीच्या विरोधात आहे'.

हेही वाचा: 'या' विश्वसुंदरींनी उंचावलं भारताचं नाव

तुफान चित्रपट 16 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये फरहान अख्तर आणि अभिनेते परेश रावल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले असून यापूर्वी राकेश यांनी फरहानला घेऊन आठ वर्षांपूर्वी भाग मिल्खा भाग हा चित्रपट केला होता.

हेही वाचा: 'हे माझं तिसरं मूल'; करीनाने शेअर केला सोनोग्राफीचा फोटो

loading image