
Filmfare Awards 2022: 'दिल मांगे मोअर!' 'शेरशाह'चाच एक नं...
67th Filmfare Awards 2022 Winners List- मनोरंजन विश्वामध्ये प्रेक्षकांना ज्या पुरस्कारांची मोठ्या प्रमाणात उत्सुकता असते त्या फिल्मफेअर (bollywood movies) पुरस्कार सोहळ्याची सांगता झाली आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यात (Bollywood Actress) बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी सहभागी झाले होते. चित्रपट विश्वामध्ये फिल्मफेयर पुरस्काराला अनन्य साधारण महत्व आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना आपल्याला हे अॅवॉर्ड मिळावं अशी अपेक्षा असते.
मुंबईमध्ये पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात रणवीर सिंग, सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे. शेरशाह या चित्रपटानं सर्वाधिक पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. यंदाचा सोहळा हा रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांनी होस्ट केला होता. यावेळी ज्या चित्रपटांचे नॉमिनेशन झाले होते ते ओटीटीवर प्रदर्शित झाले होते. विकी कौशलचा सरदार उधम आणि सिद्धार्थ मल्होत्राचा शेरशाह या चित्रपटांचा पुरस्कार सोहळ्यावर प्रभाव राहिल्याचे दिसून आले. शेरशाह हा सर्वोत्तम चित्रपट ठरला तर 83 साठी रणवीर सिंगला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तर मिमितील वेगळी भूमिका साकारलेल्या कृतीला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
शेरशाह ही अॅमेझॉन प्राईमवर रिलिज झालेली फिल्म होती. यंदाच्या फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात कियारा अडवाणी, वरुण धवन, यांनी परफॉर्मन्स दिले आहेत. आपण यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची यादी पाहणार आहोत.
शेरशाह - सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शक - विष्णुवर्धन (शेरशाह), सर्वोत्तम अभिनेता रणवीर सिंग (83), क्रिती सेनन - सर्वोत्तम अभिनेत्री (मिमी), बेस्ट फिल्म क्रिटिक - सरदार उधम, सर्वोत्तम अभिनेता (क्रिटिक - विकी कौशल - सरदार उधम), सर्वोत्तम गायक - बी प्राक (शेरशाह), सर्वोत्तम गायिका- असीस कौर (शेरशाह), सर्वोत्तम गीतलेखन - कौसर मुनीत (83) यांचा समावेश आहे.