68th Filmfare Awards 2023 Live: 'गंगुबाई काठियावाडी' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, फिल्मफेयर पुरस्कारांमध्ये बाजी

68th Hyundai Filmfare Awards 2023 मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 27 एप्रिल 2023 रोजी केले जात आहे.
68th Hyundai Filmfare Awards 2023, 68th Hyundai Filmfare Awards 2023, 68th Filmfare Awards 2023, Filmfare Awards 2023, Filmfare Awards. Filmfare 2023
68th Hyundai Filmfare Awards 2023, 68th Hyundai Filmfare Awards 2023, 68th Filmfare Awards 2023, Filmfare Awards 2023, Filmfare Awards. Filmfare 2023SAKAL

68th Filmfare Awards 2023: सर्वोत्कृष्ट सिनेमा - 'गंगुबाई काठियावाडी'

68th Filmfare Awards 2023: सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - संजय लीला भन्साली - 'गंगुबाई काठियावाडी'

68th Filmfare Awards 2023: सर्वोत्कृष्ट अभिनेता - राजकुमार राव - बधाई दो

68th Filmfare Awards 2023: सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट - 'गंगुबाई काठियावाडी'

68th Filmfare Awards 2023: बेस्ट सहाय्यक अभिनेता - अनिल कपूर- जुग जुग जियो

68th Filmfare Awards 2023: बेस्ट सहाय्यक अभिनेत्री - शीबा चढ्ढा -  बधाई दो

68th Filmfare Awards 2023: बेस्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती): भुमी पेडणेकर - बधाई दो

68th Filmfare Awards 2023: बेस्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती) - तब्बू - भुल भुलैया २

68th Filmfare Awards 2023: बेस्ट फिल्म (समीक्षक पसंती) - बधाई दो

68th Filmfare Awards 2023: बेस्ट अभिनेता (समीक्षक पसंती) - संजय मिश्रा - वध 

68th Filmfare Awards 2023: बेस्ट डायलॉग - प्रकाश कपाडीया आणि उत्कर्षिनी वसिष्ठ - गंगुबाई काठियावाडी

68th Filmfare Awards 2023: या सिनेमाची कथा ठरली बेस्ट

राजकुमार राव आणि भुमी पेडणेकर यांच्या बधाई दो सिनेमाला बेस्ट पटकथा म्हणुन फिल्मफेयर पुरस्कार मिळाला आहे. यासाठी अक्षत घिलडायल, सुमन अधिकारी आणि हर्षवर्धन कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आलंय.

राजकुमार राव आणि भुमी पेडणेकर यांच्या बधाई दो सिनेमाला बेस्ट कथा म्हणुन फिल्मफेयर पुरस्कार मिळाला आहे. यासाठी अक्षत घिलडायल आणि सुमन अधिकारी यांना सन्मानित करण्यात आलंय.

68th Filmfare Awards 2023 Live: नागराजच्या 'झुंड' सिनेमाची फिल्मफेयरमध्ये बाजी...

मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या झुंड सिनेमातील अंकुश गेडम या अभिनेत्याला बेस्ट डेब्यू अभिनेता म्हणून पुरस्कार मिळालाय. अशाप्रकारे नागराजच्या झुंडने फिल्मफेयर पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे

68th Filmfare Awards 2023: अँड द फिल्मफेयर गोज टू...

जसपाल सिंग संधू आणि राजीव बर्नवाल यांना वध सिनेमासाठी बेस्ट डेब्यू दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळालाय

Andrea Kevichusa हिला अनेक सिनेमासाठी बेस्ट डेब्यू अभिनेत्री म्हणून फिल्मफेयर मिळालाय

68th Filmfare Awards 2023: प्रेम चोप्रा यांना फिल्मफेयर जीवनगौरव

ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय

68th Filmfare Awards 2023:  ब्रम्हास्त्र सिनेमाने उमटवली संगीत विभागावर स्वतःची मोहोर

बेस्ट प्लेबॅक सिंगर फिमेल: कविता सेठ - रंगीसारी जुग जुग जियो

बेस्ट प्लेबॅक सिंगर मेल: अरिजित सिंग - केसरीया ब्रम्हास्त्र

बेस्ट गीत - अमिताभ भट्टाचार्य - केसरीया - ब्रम्हास्त्र

बेस्ट संगीत - प्रीतम - ब्रम्हास्त्र

68th Filmfare Awards 2023: आर.डी.बर्मन स्मृती विशेष पुरस्कार

फिल्मफेयर अवॉर्ड्स २०२३ मध्ये नवीन उदयोन्मुख संगीतकाराला आर.डी.बर्मन स्मृती विशेष पुरस्कार देण्यात आलाय. हा पुरस्कार जान्हवी श्रीमंकर हिला गंगुबाई काठियावाडी सिनेमातील ढोलिडा गाण्यासाठी देण्यात आलाय

68th Filmfare Awards 2023: जुने नवे सगळे कलाकार एकत्र आले

Filmfare Awards 2023 आलिशान पद्धतीने दिमाखात सुरु आहे. या सोहळ्यात मिथिला पालकर, पूनम ढिल्लन, गोविंदा, मनीश पॉल, सई ताम्हणकर असे अनेक कलाकार दिसून आले.

68th Filmfare Awards 2023: पुरस्कारांना सुरुवात... 

बेस्ट VFX: DNEG आणि Redefine ब्रह्मास्त्र

बेस्ट बॅकग्राउंड स्कोर: संचित बलहारा आणि अंकित बलहारा - गंगुबाई काठियावाडी

बेस्ट अँक्शन: परवेझ शेख - विक्रम वेधा

बेस्ट सिनेमेटोग्राफी : सुदीप चॅटर्जी - गंगुबाई काठीयावाडी

बेस्ट कोरिओग्राफी: कृती महेश (ढोलीडा) - गंगुबाई काठीयावाडी

बेस्ट एडिटिंग : निनाद खानोलकर - अँन अँक्शन हिरो

बेस्ट प्रोडक्शन डिझाईन: सुब्रता चक्रबोर्ती, अमित रॉय - गंगुबाई काठीयावाडी

बेस्ट साउंड डिझाईन : बिश्र्वदीप दीपक चॅटर्जी: ब्रह्मास्त्र

68th Filmfare Awards 2023: अंकिता लोखंडे - विकी जैन हे नवरा बायको फिल्मफेयरमध्ये

पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडे कायमच चर्चेत असते. फिल्मफेयर अवॉर्ड्स २०२३ मध्ये अंकिताने नवरा विकी जैन सोबत शानदार एंट्री केलीय. अंकिता आणि विकीच्या खास ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

68th Filmfare Awards 2023: मराठमोळ्या अमृता खानविलकरचा फिल्मफेयर अवॉर्ड्स मध्ये जलवा

फिल्मफेयर अवॉर्ड्स २०२३ मध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा ग्लॅमरस अंदाज बघायला मिळाला. अमृता सोनेरी चमचमत्या ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर आणि मनमोहक दिसतेय. अमृताने तिची खास अदा दाखवत मीडियासमोर फोटोशूट केलंय

68th Filmfare Awards 2023: दबंग अंदाजात सलमान खानची ग्रँड एंट्री

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची फिल्मफेयर सोहळ्यात शानदार एंट्री झालीय. सलमानने संपूर्ण ब्लॅक रंगाचं आऊटफिट परिधान केलं असून त्याच्या नेहमीच्या स्वॅग मध्ये सलमानने मीडियासमोर फोटोशूट केलं

68th Filmfare Awards 2023: आला रे आला गोविंदा आला

गोविंदा हा फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये उपस्थिती दर्शवणारा पहिला बॉलिवूड अभिनेता आहे. तो त्याच्या संपुर्ण कुटुंबासह होता.

68th Filmfare Awards 2023 मध्ये अमृता फडणवीस यांची ग्रॅंड एन्ट्री

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांची Filmfare Awards 2023 मध्ये ग्रँड एंट्री झालीय. अमृता यांनी गोल्डन रंगाची साडी परिधान केलेली दिसतेय.

68th Hyundai Filmfare Awards 2023 LIVE

Filmfare Awards 2023: दरवर्षीप्रमाणे या वर्षीही चाहते फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीत फिल्मफेयर हा मोठा सोहळा मानला जातो. फिल्मफेअर पुरस्कारांचे यंदाचे आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 27 एप्रिल 2023 रोजी केले जात आहे.

या अवॉर्ड नाईटमध्ये मनोरंजन विश्वातील सर्वच कलाकारांचा मेळावा पाहायला मिळणार आहे. 19 मुख्य श्रेणींमध्ये नॉमिनेशनसह तांत्रिक आणि गैर-तांत्रिक श्रेणींमध्ये अनेक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. आता या पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी याकडे सर्वाचं लक्ष आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com