83 Teaser: 'त्या' झेलने रचला भारताचा इतिहास, टीझर पाहून अंगावर उभे राहतील रोमांच! Ranveer Singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranveer Singh

83 Teaser: 'त्या' झेलने रचला भारताचा इतिहास, टीझर पाहून अंगावर उभे राहतील रोमांच!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

दिग्दर्शक कबीर खानचा बहुचर्चित चित्रपट '८३'चा ट्रीझर आज (शुक्रवारी) प्रदर्शित झाला. येत्या ३० नोव्हेंबर रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या टीझरची सुरुवात भारतीय क्रिकेट इतिहासातील गौरवशाली दिवसाच्या ग्रेस्केल व्हिज्युअलने होते. २५ जून १९८३ रोजी लंडनमध्ये लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियम येथे घडलेल्या या ऐतिहासिक दृश्याने या टीझरचा शेवट होतो. कपिल देव यांच्या त्या झेलने फलंदाज विव्ह रिचर्ड्सला बाद केलं होतं. तेव्हा भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा पराभव करून १९८३ चा विश्वचषक जिंकला होता.

'८३' हा चित्रपट क्रिकेट विश्वचषकातील भारताच्या विजयाची कहाणी दर्शवणारा आहे. या चित्रपटात रणवीर सिंग हा कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर पोस्ट करताना रणवीरने लिहिलं, 'भारताच्या सर्वात मोठ्या विजयामागील कथा. सर्वात मोठी कथा. सर्वात मोठा गौरव.' हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या २४ डिसेंबर रोजी हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण ही कपिल देव यांची पत्नी रुमी देवची भूमिका साकारणार आहे. २०१९ मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. सुरुवातीला हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

हेही वाचा: 'आई कुठे काय करते' मालिकेवर पुरस्कारांचा वर्षाव

या चित्रपटात अभिनेते पंकज त्रिपाठी हे मॅनेजर पीआर मान सिंग यांची भूमिका साकारणार आहेत. तर अॅमी वर्क बलविंदर सिंग संधूच्या भूमिकेत आहेत. साहिल खट्टर सय्यद किरमाणी तर ताहिर भसिन हे सुनील गावस्कर यांची भूमिका साकारणार आहेत.

loading image
go to top