'पानिपत'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन काय?; मुंबईत सर्वाधिक प्रतिसाद

टीम ई-सकाळ
Sunday, 8 December 2019

- चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी तिसऱ्या युद्धावर आधारित 'पानिपत' हा चित्रपट प्रदर्शित केला

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी तिसऱ्या युद्धावर आधारित 'पानिपत' हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर आणि क्रिती सनॉन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी चांगलीच कमाई केली आहे. शनिवारपर्यंत या चित्रपटाने 9 कोटी 90 लाख रुपयांची कमाई केली. मुंबईत या चित्रपटाने शुक्रवारी सर्वाधिक 1.77 कोटी तर शनिवारी 2.74 कोटी कमाई केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

'पानिपत'ने सुरवातीला म्हणजे पहिल्या दिवशी अत्यंत कमी कमाई केली. त्यानंतर या चित्रपटाची कमाई वाढत गेली. आता या चित्रपटाने शनिवारपर्यंत 9 कोटी 90 लाख रुपयांची कमाई केली. पानिपत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी शुक्रवारी 4 कोटी 12 लाख, शनिवारी 5 कोटी 78 लाखांची कमाई केली.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पानिपत'ने जवळपास तीन तासांचा असल्याने मल्टिप्लेक्समध्ये शो टाइम देताना थिएटर मालकांना विचार करावा लागत आहे. या चित्रपटाने शुक्रवारी 4.12 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.  

पंतप्रधानांच्या आगमन बंदोबस्तादरम्यान पोलिसांच्या अंगावर एकाने घातली कार

शहरं आणि कमाई

- मुंबई : 1.77 कोटी / 2.74 कोटी.

- दिल्ली/यूपी : 62 लाख / 81 लाख.

- पंजाब : 27 लाख / 37 लाख.

- राजस्थान : 16 लाख / 19 लाख.

- म्हैसूर : 19 लाख / 28 लाख.

- पश्चिम बंगाल : 13 लाख / 19 लाख.

- बिहार : 9 लाख/ 11 लाख. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 Crores 90 Lakhs Collection of Movie Panipat