Urfi Javed video
Urfi Javed videoEsakal

Urfi Javed Video: 'असे कपडे भारतात चालत नाहीत', उर्फी अन् 'त्यांची' चांगलीच जुंपली..

Urfi Javed Video Viral: सोशल मिडियावर उर्फीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती एका व्यक्तीसोबत भांडतांना दिसत आहे.
Published on

Urfi Javed Video Viral: उर्फी जावेद हे सोशल मिडियावर कायम चर्चेत राहणारं नाव आहे. ती तिच्या चित्र विचित्र फॅशनसाठी खूप प्रसिद्ध आहे. ती नेहमीच अशी काही फॅशन करून चाहत्यांसमोर येते की ते पाहिल्यानंतर नेटकरी डोक्यालाच हात लावतात. उर्फी जावेद स्वतःला ट्रेंडिंग गोष्टींपासून अजिबात मागे ठेवत नाही. आत्ता पर्यंत उर्फी अनेक वस्तूंपासून ड्रेस तयार करुन फॅशन करतांना दिसते.

Urfi Javed video
Barbie- Baipan Bhari Deva: महाराष्ट्रात 'बाईपण भारी ' अन् जगात 'बार्बी'! कमाईचे आकडे पाहून व्हाल हैराण

उर्फी नुकतीच गोव्याला सुट्टीचा आनंद घ्यायला गेली होती. तिचे रिसोर्ट वरील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले ज्यात तिच्या फॅशनची झलक दाखवली होती.

मात्र आता सोशल मिडियावर उर्फीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती एका व्यक्तीसोबत भांडतांना दिसत आहे. या व्हिडिओत तिच्यासोबत तिची बहीणदेखील दिसत आहे. जी या भांडणात मध्यस्थी करुन ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

Urfi Javed video
Prajakta Mali: तु संन्यासी होणार वाटतंय! प्राजक्ताच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग' फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

या व्हिडिओत तो व्यक्ती तिला म्हणतो की, 'असे कपडे भारतात चालत नाही. तू इंडियाचं नाव खराब करत आहे. तुझ्यामुळे आमचं नाव खराब होत आहे', यावर उर्फीही त्याला चांगलचं सुनावते. ती त्याला म्हणते की, 'काका तुम्ही तूमचं काम करा.तुमच्या कामाशी काम ठेवा. मी काही तुझी मुलगी नाही..', तिची बहीणदेखील त्याला शांत राहण्यासाठी सांगते.

Urfi Javed video
Jayant Savarkar: 'तुम्ही शेवटपर्यंत काम करत होतात अन्..' जयंत अण्णांच्या निधनाने मराठी कलाकार भावुक..

सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडिओवर प्रतिक्रियादेखील देत आहे. अनेकांनी उर्फीला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी तिच्यावर टिका केली आहे. अनेकांनी व्हिडिओतील व्यक्तीला पाठिंबा दिला आहे. तर महिलांनी काय परिधान करावं आणि कसे रहावे याचा निर्णय पुर्णपणे त्यांचा असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com