AR Rahman Video: एआर रहमानने पुणे पोलिसांचे कान टोचले! शो बंद केल्याच्या कृतीची तुलना करत म्हणाले,..

A. R. Rahman
A. R. RahmanEsakal

ए आर रहमान हे देशातील प्रसिद्ध संगीतकारांपैकी एक आहेत. त्यांनी हिंदी आणि तमिळ भाषेसाठी अनेक गाणी गायली आहेत. त्यांचा आवाज केवळ देशातच नाही तर परदेशातही लोकप्रिय आहे. त्यांना ऑस्करही मिळाला आहे.

पण सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती त्याच्या पुण्यातील लाईव्ह शोची. पुण्यात त्यांची मैफल होती, त्यात पोलिसांनी स्टेजवर येवुन शो बंद केला. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांमध्ये पोलिसांचा रोष ओढवला आणि त्यानंतर सोशल मिडियावर वातावरण खुप तापलं होते.

A. R. Rahman
Salman Khan: 'तू घाबरु नकोस'! उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, 'सलमान मुंबईपेक्षा सुरक्षित...'

पुण्यातील राजा बहादूर मिल परिसरात एआर रहमानचा कॉन्सर्ट सुरू होता. यावेळी हजारोंच्या संख्येने लोक त्या मैफिलीचा आनंद लुटत होते. ही मैफल सुरू असतानाच पोलिसांनी येऊन मैफल थांबवली. त्याचे फोटोही व्हायरल होत आहेत की जेव्हा एआर रहमान गाणे म्हणत आहेत, तेव्हा पोलिस येऊन त्यांचा शो थांबवतात.

मात्र या प्रकरणावर ए आर रहमान यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती त्यामुळेही सोशल मिडियावर चर्चा रंगल्या होत्या. आता या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, रात्री 10 वाजल्यानंतर गाणे आणि वादन करण्यास परवानगी नाही.आता ए.आर. रहमान यांनी त्यांच्या परिचित शैलीत पुणे प्रकरणावर सडेतोड उत्तर दिले आहे.

A. R. Rahman
Met Gala 2023Vral Video: झुरळ म्हणतयं मला रॅम्प वॉक करायचा...

त्यानी कॉन्सर्टचा व्हिडिओ त्याच्या सोशल मिडियावर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, 'काल स्टेजवर आपण सर्वांनी "रॉकस्टार" चा क्षण अनुभवला होता का? मला वाटतं आम्ही ते केलं. प्रेक्षकांच्या प्रेमाने आम्ही भारावून गेलो आणि आणखी काही देऊ इच्छित होतो... पुणे, अशा संस्मरणीय संध्याकाळसाठी पुन्हा एकदा धन्यवाद."

A. R. Rahman
Priyanka Chopra: एक नंबर जोडी! देसी गर्लनं नवऱ्यासोबत Met Gala 2023 फॅशन शोमध्ये केली हवा...

रॉकस्टार चित्रपटातील एक सीन आहे ज्यात रणबीरच्या 'सदा हक' या गाण्याचा म्युझिक कॉन्सर्ट सुरू असताना पोलिस येतात अन् त्यांचा कार्यक्रम थांबवतात. त्याचीच पुर्णआवृत्ती केल्याचं संगीत दिग्दर्शक ए आर रहमान आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com