Salman Khan: 'तू घाबरु नकोस'! उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, 'सलमान मुंबईपेक्षा सुरक्षित...'

 Devendra Fadnavis On Salman Khan
Devendra Fadnavis On Salman KhanEsakal

 Devendra Fadnavis On Salman Khan: बॉलिवुडचा भाईजान म्हणजेच सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांसाठी चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी त्याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सलमानचे चाहते वगळता या चित्रपटाला काही चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्याचबरोबर त्याला बिश्नोई गँगनंही जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे सलमान थोडा घाबरलेलाही दिसत आहे.

 Devendra Fadnavis On Salman Khan
PS 2 Box Office Collection: सलमानचा भाईजान कोमात ऐश्वर्या जोमात! पोनियिन सेल्वन 2 चं बॉक्स ऑफिसवर नॉट आउट द्विशतक पुर्ण!

याधमकीनंतर सलमानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील त्याच्या घराभोवती मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही आहे. मुंबई पोलिसांनी त्याला Y+ श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे आणि त्याने स्वतःसाठी बुलेटप्रूफ एसयूव्ही देखील खरेदी केली आहे.

 Devendra Fadnavis On Salman Khan
Priyanka Chopra: एक नंबर जोडी! देसी गर्लनं नवऱ्यासोबत Met Gala 2023 फॅशन शोमध्ये केली हवा...

'आप की अदालत' या कार्यक्रमात बोलताना सलमान म्हणाला होता की, असुरक्षिततेपेक्षा सुरक्षितता चांगली आहे. होय, सुरक्षितता तर आहे. आता, रस्त्यावर सायकल चालवणे आणि एकटे कुठंही जाणं शक्य नाही. समस्या अशी आहे की जेव्हा तो ट्रॅफिकमध्ये असतो तेव्हा खूप सुरक्षितता असते, वाहनांमुळे इतर लोकांची गैरसोय होते.

आता मुंबईपेक्षा दुबई जास्त सुरक्षित वाटू लागली आहे. दुबई सुरक्षेच्या दृष्टीनं त्याला जास्त जवळची वाटत असून मुंबईमध्ये काहीही सुरक्षित नसल्याचं दिसून येते आहे. तो खूप काळजी घेतो असंही त्यांन सांगतिलं होते.

कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमकी अन् सलमानची सुरक्षा लक्षात घेऊन त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आता या प्रकरणावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आणि सलमानच्या सुरक्षेच्या तयारीबाबत अपडेट दिले आहे.

 Devendra Fadnavis On Salman Khan
Ajit Pawar on TDM: हे दुर्दैव, सिनेमाला लवकरात लवकर.. TDM साठी अजित पवारांनी दिला आदेश

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'सलमान खानची सुरक्षा सर्वोच्च पातळीची आहे. त्याला मुंबईत किंवा भारतात कुठेही फिरायला हरकत नाही. मला वाटतं मुंबईपेक्षा सुरक्षित जागा नाही.

 Devendra Fadnavis On Salman Khan
Met Gala 2023Vral Video: झुरळ म्हणतयं मला रॅम्प वॉक करायचा...

सलमानच्या या वक्तव्यावरून कंगना राणौतचे वक्तव्य देखीलसमोर आले होते. कंगनाच्या मते, सलमान खानला काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्यांला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे संरक्षण मिळाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com