
अभिमान..! इस्त्राईल मधील रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मिळणार, Digpal Lanjekar यांचा विशेष सन्मान
Digpal Lanjekar News: आज शिवजयंती निमित्ताने महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी गोष्ट घडली आहे. इंस्त्राईल मधील रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिलं गेलंय. याशिवाय शिवराज अष्टकचे निर्माते - दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनाही खास आमंत्रण देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आलाय.
(A road in Israel is named Chhatrapati Shivaji Maharaj, a special tribute to Digpal Lanjekar)
दिग्पाल लांजेकर यांनी यानिमित्ताने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेयर केलाय. दिग्पाल लिहितात. "ईस्राईल... छळाकडून बळाकडे गेलेल्या या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपार उत्सुकता आहे. त्याचाच एक भाग म्हणून इस्राईलच्या सांस्कृतिक मंत्रालयाने इस्राईल मधील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांच्या शासनासमोर ठेवला आहे.
विविध क्षेत्रांतील कामामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या लोकांशी चर्चा करून इस्राईल चे Consulate हे शिवरायांच्या बाबतीत माहिती गोळा करत आहेत. Consulate ऑफिस मधून आलेल्या निमंत्रणानुसार Consul general Mr. Kobbi Shoshani यांची भेट झाली.
त्यावेळी त्यांच्याशी शिवरायांच्या रोमहर्षक प्रशासकीय गुणांची आणि त्यासंदर्भातील प्रसंगांची चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी दिग्पाल लांजेकर यांनी सांगितलेले मुद्दे ऐकल्यानंतर श्री. kobbi यांनी शिवरायांची प्रशंसा केली.
त्यांना कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचा अनुवादित ग्रंथाची इंग्रजी प्रत आणि महाराजांच्या जिरेटोपाचे स्मृतिचिन्ह श्री. दिग्पाल लांजेकर यांनी भेट दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्रिखंडात असेच गाजत राहो आणि या शिवयज्ञात सातत्याने आमच्याकडून समिधा अर्पण होत राहोत ही शिवचरणी प्रार्थना..
दिग्पाल लांजेकरच्या (digpal lanjekar) संकल्पनेतील 'शिवराज अष्टक' या शिवचरित्रावरील चित्रपट श्रुखंलेला तमाम शिवभक्त आणि रसिकांमध्ये खूपच लोकप्रियता मिळाली.
शिवराज अष्टक मधील पुढचा सिनेमा म्हणजेच ‘सुभेदार’ या चित्रपटाची घोषणाही करण्यात आली आहे. जून २०२३ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इस्त्राईल मध्ये दिग्पाल लांजेकर यांचा झालेला सन्मान त्यांच्या कार्याला मिळालेली पोचपावतीच आहे.